AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मध्ये मिळाले 50 लाख, 13 चेंडूत फिरवली मॅच, फक्त 68 सेकंदाचा VIDEO बघा

IPL 2023 साठी एका फ्रेंचायजीने 'या' खेळाडूला विकत घेतलय. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SA20 लीगमध्ये या प्लेयरने धमाका केलाय.

IPL मध्ये मिळाले 50 लाख, 13 चेंडूत फिरवली मॅच, फक्त 68 सेकंदाचा VIDEO बघा
CSAImage Credit source: CSA
| Updated on: Jan 12, 2023 | 7:46 AM
Share

IPL 2023 चा सीजन सुरु व्हायला अजून थोडावेळ बाकी आहे. पण आतापासूनच या टुर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या प्लेयर्सची चर्चा सुरु झालीय. 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये लिलाव झाला. यावेळी काही बड्या प्लेयर्सची मोठ्या किंमतीला विक्री झाली. काही नवीन खेळाडूंना सुद्धा भरपूर पैसा मिळाला. यापैकी काही खेळाडूंनी आयपीएल सीजन सुरु होण्याआधीच आपला जलवा दाखवलाय. दक्षिण आफ्रिकेत टी 20 लीगचा पहिला सीजन सुरु झालाय. नव्या लीगची जोरदार सुरुवात झालीय. दुसऱ्याच मॅचमध्ये एका प्लेयरने वादळी खेळी केली. IPL ऑक्शनआधी या खेळाडूला फार कमी जण ओळखत होते. पण 40 चेंडूत या प्लेयरने स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडलय.

27 धावात गेलेल्या 4 विकेट

SA 20 लीगच्या दुसऱ्या सामन्यात बुधवारी 11 जानेवारीला डरबन सुपर जायंट्स आणि जोबर्ग सुपर किंग्सच्या टीम आमने-सामने होत्या. जोबर्गच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांची टॉप आणि मीडल ऑर्डर प्रभाव पाडू शकली नाही. कॅप्टन फाफ डुप्लेसनी जरुर प्रयत्न केले. पण त्याने फार फरक पडला नाही. फक्त 27 धावात 4 विकेट गमावणाऱ्या सुपर किंग्सला मोठ्या धुवाधार इनिंगची आवश्यकता होती.

किती वर्षाचा आहे हा खेळाडू?

डॉनोवन फरेरा हा 24 वर्षांचा खेळाडू आहे. त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहितीय. तो आक्रमक बॅट्समन आहे. पण उदहारण म्हणून सांगण्यासाठी आकडे नव्हते. SA T20 लीगच्या निमित्ताने त्याला संधी मिळाली. डॉनोवनने कमाल केली. डॉनोवन फरेराने क्रीजवर येताच गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने मोठे शॉट्स मारले. फरेराने मारलेला एक सिक्स 104 मीटर लांब होता. त्याने फक्त 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

13 चेंडूत कुटल्या 62 धावा

अर्धशतक झळकवल्यानंतर तो अधिक आक्रमक झाला. फरेरा शेवटपर्यंत नाबाद राहिला. सुपरकिंग्सने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 190 धावा केल्या. फरेराने फक्त 40 चेंडूत 205 च्या स्ट्राइक रेटने 82 धावा केल्या. यात 62 रन्स त्याने फक्त 13 बॉलमध्ये केले. त्याने 5 सिक्स आणि 8 फोर मारले. त्याच्याशिवाय रोमारियो शेफर्डने सुद्धा धुलाई केली. 19 चेंडूत 4 सिक्स आणि 2 फोरसह त्याने 40 धावा केल्या. 50 लाख रुपयात राजस्थानने घेतलं विकत

डॉनोवन फरेरा हे नाव मागच्या महिन्यात आयपीएल लिलावा दरम्यान पुकारण्यात आलं होतं. त्याची बेस प्राइस फक्त 20 लाख रुपये होती. दक्षिण आफ्रिकेबाहेर कदाचितच कोणी हे नाव ऐकल असेल. त्याच नाव पुकारताच फ्रेंचायजीमध्ये विकत घेण्यासाठी चढा-ओढ सुरु झाली. राजस्थान रॉयल्सने या बॅट्समनला 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. फरेराने 21 टी 20 इनिंगमध्ये 153 च्या स्ट्राइक रेटने 539 धावा केल्या आहेत.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.