AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : संजू सॅमसनचं विस्फोटक शतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 203 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

South Africa vs India 1st T20I : संजू सॅमसन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला 200 पार मजल मारता आली. संजू टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये सलग दुसरं शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला.

SA vs IND : संजू सॅमसनचं विस्फोटक शतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 203 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
sanju samson ind vs sa 1st t20iImage Credit source: Icc X account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 08, 2024 | 10:46 PM
Share

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी 20I सामन्यात विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने संजू सॅमसन याच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. संजूने 107 धावांची खेळी केली. संजूच्या टी 20i कारीकीर्दीतील हे एकूण आणि सलग दुसरं शतक ठरलं. संजू व्यतिरिक्त तिलक वर्मा याने 33 तर सूर्यकुमार यादव याने 21 धावा केल्या. टॉप ऑर्डरमधील या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक खेळी केल्याने मागील फलंदाजांना या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत अखेरीस फटकेबाजी करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला अखेरच्या क्षणी सातत्याने झटके दिले. हार्दिक पंड्या, रिंकु सिंह आणि अक्षर पटेल हे तिघेही स्फोटक बॅटिंग करुन फिनिशिंग टच देण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले.

टीम इंडियाची बॅटिंग

टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाने 16 धावांवर पहिली विकेट गमावली. अभिषेक शर्मा 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार 21 धावांवर बाद झाला. संजू आणि तिलक वर्मा या दोघांनी दोन्ही बाजूने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 77 धावा जोडल्या. त्यानंतर तिलक वर्मा 33 धावा करुन आऊट झाला. या दरम्यान संजूने टी 20i मध्ये सलग दुसरं शतक ठोकलं. मात्र संजूला शतकाचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. संजू 50 बॉलमध्ये 7 चौकार आणि 10 षटकारांसह 107 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे भारताची 15.4 ओव्हरमध्ये बाद 175 अशी स्थिती झाली.

दक्षिण आफ्रिकेने इथून टीम इंडियाच्या फलंदाजांना सलग झटके देत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. संजूनंतर हार्दिक, रिंकु आणि अक्षर या तिघांवर मोठी जबाबदारी होती. मात्र या तिघांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गुंडाळला. हार्दिक पंड्या 2, रिंकु सिंह 11 आणि अक्षर पटेल 7 धावा करुन आऊट झाले. तर रवी बिश्नोईने 1 धाव केली. तर अर्शदीप सिंह 5 धावांवर नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन, पॅट्रिक क्रुगर आणि न्काबायोमझी पीटर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

संजूचा शतकी तडाखा, इंडिया 200 पार

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...