AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा तेंडुलकरच्या निर्णयानंतर सचिनला भावना अनावर, भावी सून सानियाने केलं असं काही…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा कायम चर्चेत असते. सारा तेंडुलकरने मुंबईतील अंधेरीत पिलेट्स अकादमी सुरु केली आहे. याचं उद्घाटन 21 ऑगस्टला झालं. यावेळी वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली उपस्थित होते.

सारा तेंडुलकरच्या निर्णयानंतर सचिनला भावना अनावर, भावी सून सानियाने केलं असं काही...
सारा तेंडुलकरच्या पिलेट्स स्टुडिओत सचिनला भावना अनावर, भावी सून सानियाने केलं असं काही...Image Credit source: Sachin Tendulkar X
| Updated on: Aug 22, 2025 | 8:11 PM
Share

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी आता लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स लाखोंच्या घरात आहेत. ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच दैनदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी शेअर करत असते. विदेश दौरा असो की मित्रांसोबत पार्टी सर्वकाही शेअर करते. पण तिच्य़ा फिटनेससंबधी पोस्टचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या क्षेत्रात साराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता साराने त्या क्षेत्रात ठसा उमटवण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालक असलेल्या साराने आता स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. यासाठी साराने पिलेट्स स्टुडिओ सुरु केला आहे. पिलेट्स अकादमीत फिटनेसचे धडे दिले जाणार आहे. शरीरिकदृष्ट्या कसं सक्षम राहता येईल यासाठी मार्गदर्शन दिलं जाणार आहे. या स्टुडिओचं उद्घाटन सचिन तेंडुलकरने श्रीफळ फोडून केलं. यावेळी अंजली तेंडलकर, साराची भावी वहिनी सानिया चंडोकही उपस्थित होती.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उद्घाटनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच एक भावुक पोस्ट लिहिली आहे. “पालक म्हणून, तुम्ही नेहमीच अशी आशा करता की तुमच्या मुलांनी त्यांना आवडणारे काहीतरी करावे. साराला पिलेट्स स्टुडिओ उघडताना पाहणे हा असाच एक क्षण आहे ज्यामुळे आम्ही आनंदाने भारावून गेलो आहोत.”

सचिन तेंडुलकर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुढे लिहिलं की, “साराने हा संपूर्ण प्रवास तिच्या कठोर परिश्रम आणि विश्वासाने पूर्ण केला आहे. पोषण आणि चालणं फिरणं नेहमीच आमच्या जीवनाचा एक भाग राहिला आहे आणि सारा तिच्या पद्धतीने हा विचार पुढे नेत आहे हे पाहणे खूप खास आहे. सारा, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. या नवीन सुरुवातीबद्दल अभिनंदन.”

साराच्या पिलेट्स स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी सानिया चंडोकही उपस्थित होती. तिने साराला या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं. सानिया ही साराची मैत्रिण आणि भावी वहिनी आहे. काही दिवसांपूर्वी सानिया आणि अर्जुनचा साखरपुडा पार पडला. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणारा आहे. तत्पूर्वी सानिया तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिसली.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था