AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI Recruitment : बीसीसीआयने 7 रिक्त पदांसाठी मागवले अर्ज, वर्षाकाठी 90 लाखांचा पगार

बीसीसीआय या श्रीमंत क्रिकेट बोर्डाने सात पदांसाठी अर्ज मागवले आहे. या पदांवरील व्यक्तींना लाखोंच्या घरात पगार मिळणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची 10 सप्टेंबर असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरता येईल. चला जाणून घेऊयात सविस्तर काय ते...

BCCI Recruitment : बीसीसीआयने 7 रिक्त पदांसाठी मागवले अर्ज, वर्षाकाठी 90 लाखांचा पगार
BCCI Recruitment : बीसीसीआयने 7 रिक्त पदांसाठी मागवले अर्ज, वर्षाकाठी 90 लाखांचा पगारImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 22, 2025 | 6:44 PM
Share

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे बीसीसीआयसोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना एक संधी चालून आली आहे. मात्र यासाठी काही अटी आणि शर्थी आहे. या पदांसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीच्या पदाव्यतिरिक्त, महिला आणि कनिष्ठ निवड समितीच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने त्यांच्या वेबसाईटवर या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. वरिष्ठ पुरुष संघासाठी दोन राष्ट्रीय निवड समिती सदस्य, महिला संघासाठी चार निवड समिती सदस्या आणि कनिष्ठ संघासाठी एक निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदावरील व्यक्तीला 90 लाखांचं वार्षिक वेतन असणार आहे. राष्ट्रीय निवडकर्त्याच्या पदासाठी 10 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

पुरुष संघासाठी राष्ट्रीय निवडकर्ते : दोन पदासाठी ही जागा भरली जाणार आहे. वरिष्ठ पुरुषांच्या कसोटी, वनडे-टी20 आंतरराष्ट्रीय संघाची निवड करण्यासाठी ही पदं भरली जातील. यासाठी किमान 7 कसोटी सामने आणि 30 प्रथम श्रेणी किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळणं आवश्यक आहे. खेळाडू 5 वर्षांपूर्वी निवृत्त झालेला असावा. इतकंच काय तर बीसीसीआय क्रिकेट समितीचा सदस्य नसावा.

महिला संघासाठी राष्ट्रीय निवडकर्ते : या पदासाठी इच्छुक असलेल्यांना एकदिवसीय, कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी महिला संघ निवडावा लागणार आहे. याव्यतिरिक्त ते प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि इतर बाबींसाठी जबाबदार असतील. या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळलेली असावी. 5 वर्षापूर्वी निवृत्त झालेली असावी. तसेच पाच वर्षे बीसीसीआय क्रिकेट समितीचा सदस्य नसावी.

ज्युनिअर पुरुष संघ (22 वर्षाखालील) निवडीसाठी एका सदस्याची निवड केली जाणार आहे. दौरे आणि स्पर्धांसाठी संघ निवडण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. त्याने किमाना 25 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. पाच वर्षापूर्वी निवृत्त झालेला असावा. तसेच पाच वर्षे क्रिकेट समितीचा सदस्य नसावा. या अटी पूर्ण आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला बीसीसीआयकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. कोणत्याही पदासाठी बीसीसीआयच्या अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. वरिष्ठ संघ निवड समितीच्या सदस्यांना सुमारे 90 लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाईल. तर ज्युनियर क्रिकेट समितीच्या सदस्यांना 30 लाख रुपये वार्षिक वेतन मिळते.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.