सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग वा सौरव गांगुली, कोणत्या खेळाडूला BCCI देते सर्वाधिक पेन्शन?

Retired Cricketers Pension: BCCI च्या निवृत्ती वेतन योजनेतंर्गत कसोटी सामन्यांच्या आधारे माजी क्रिकेटपटूंना पेन्शन देण्यात येते. तेंडुलकर, सेहवाग आणि गांगुलीला किती मिळेत निवृत्ती रक्कम?

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग वा सौरव गांगुली, कोणत्या खेळाडूला BCCI देते सर्वाधिक पेन्शन?
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली
| Updated on: Aug 06, 2026 | 3:05 PM

Retired Cricketers Pension: रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंनी 19 जुलै 2026 रोजी इंग्लंडविरोधात त्यांचा अखेरचा समाना खेळला. इंग्लंडविरोधात त्यांनी तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना खेळला. त्यात रोहित शर्मा याने 138 धावा ठोकल्या तर विराट कोहलीने 74 धावा चोपल्या. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली की, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांना किती पेन्शन मिळते याची चर्चा सुरू झाली. BCCI च्या निवृत्ती वेतन योजनेतंर्गत कसोटी सामन्यांच्या आधारे माजी क्रिकेटपटूंना पेन्शन देण्यात येते. पण या दिग्गज खेळांडूपैकी कुणाला मिळते सर्वाधिक निवृत्ती रक्कम?

BCCI ची पेन्शन स्कीम आहे काय?

कोणत्या खेळाडूला किती पेन्शन देणार याचे खास गणित आहे. BCCI ने वर्ष 2004 मध्ये निवृत्त खेळाडूंसाठी दरमहा पेन्शन स्कीम सुरू केली होती. त्यावेळी कसोटी सामना खेळलेल्या माजी खेळाडू आणि अंपायरासाठी दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात येत होती. यानंतर वर्ष 2012 मध्ये बोर्डाने एक नवीन योजना सुरू केली होती. त्यातंर्गत खेळाडूंनी कसोटी सामन्यांच्या संख्या आधारे संपूर्ण रक्कम देण्यात येऊ लागली. वर्ष 2022 मध्ये जेव्हा सौरव गांगुली BCCI चे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी पेन्शन योजनेत मोठा बदल केला. सध्या हाच बदल लागू आहे. हा नवीन नियम 1 जून 2022 रोजीपासून लागू झाला.

सचिन, सेहवाग आणि गांगुलीला किती पेन्शन?

क्रिकेट जगातातील हे दिग्गज खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर यांना BCCI दरमहा 70,000 रुपयांचे निवृत्ती वेतन देते. इतकेच पेन्शन सौरव गांगुली यांनाही मिळते. यासोबतच सुनील गावस्कर, कपिल देव यांनाही दरमहा 70,000 रुपये मिळते. तर वीरेंद्र सेहवाग सुद्धा याच श्रेणीत आहेत. त्यांनी टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी सामना खेळलेले आहेत.

सर्वाधिक पेन्शन कुणाला?

BCCI च्या पेन्शन स्कीममध्ये सर्वात उच्च श्रेणीत म्हणजे टॉप स्लॅबमध्ये सर्व खेळाडूंना समान पेन्शन देण्यात येते. याचा अर्थ सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली या तिघांना ही 70,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळते. म्हणजे या श्रेणीतील खेळाडूमधील पेन्शनमध्ये कोणताही बदल नसतो. सर्वांना सारखी पेन्शन मिळते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पेन्शनविषयी विचार करता, BCCI च्या नियमानुसार, ज्या खेळाडूने 25 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत, त्यांना 70,000 रुपयांची पेन्शन मिळेल. या आकडेवारीनुसार, रोहित शर्मा याने आतापर्यंत 67 कसोटी सामने खेळले आहेत. तर विराट कोहली याने 123 कसोटी सामने खेळले आहेत. दोघांनाही पेन्शन लागू होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us