Video : धोनीचं फार्म हाऊस, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अधिककाळ आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसून येतो. त्याची पत्नी साक्षी त्यांचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते.

Video : धोनीचं फार्म हाऊस, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना
धोनी फार्म हाऊस

रांची : कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल रद्द झाल्यामुळे सध्या महेंद्रसिंग धोनी फार्म हाऊसवर त्याच्या फॅमिलीसोबत निवांत वेळ घालवताना दिसतो आहे. त्याच्या फार्महाऊसची घरबसल्या
सैर तुम्हीही करु शकता. त्यासाठी फार्म हाऊसचे काही खास व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. धोनीची पत्नी साक्षी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत तिच्या इन्स्टाग्रामवरुन फार्महाऊसचे आणि तेथील प्राण्यांसह इतर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. (Sakshi Dhoni Shares Former team India Captain Mahendra singh Dhonis Farm House Photos videos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

धोनीचे हे फार्म हाऊस रांची येथे असून ‘कैलाशपती’ असं या फार्महाऊसचं नाव आहे. या सर्व फार्महाऊसची काळजी घेण्यासाठी बरेच नोकर चाकर असतानाही धोनीह स्वत:ही त्यात लक्ष देताना दिसून येतो. या फार्महाऊसमध्ये कुत्री, गायी, घोडे असे अनेक पाळीव प्राणी आहेत. सोबतच फळ आणि भाज्यांची झाडंही आहेत. धोनी या झाडांसह तेथील प्राण्यांची काळजी स्वत: घेत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

फार्म हाऊस नव्हे, छोटे शहरचं

धोनीचं हे फार्म हाऊस म्हणजे एक घर किंवा बंगला नसून एक छोटं शहरच आहे. सर्व सोयी-सुविधा असणारे हे फार्म हाऊस फुला-फळांनी देखील बहरलेलं आहे. या ठिकाणी धोनीचे पाळीव प्राणी मुक्तपणे संचार करताना दिसून येत असतात. यात विविध प्रकारचे श्वान, घोड्यांसह गायी असे अनेक प्राणी दिसून येतात. धोनी मोटरबाईक्सचा दिवाना असल्याने त्याच्या विविध मोटरबाईक आणि कार्सही या ठिकाणी असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

हे ही वाचा :

आयपीएलच्या उर्वरित सामन्यात MS Dhoni धमाका करेल, चेन्नईच्या खेळाडूची भविष्यवाणी

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…

Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

(Sakshi Dhoni Shares Former team India Captain Mahendra singh Dhonis Farm House Photos videos)