मांजरेकर आणि आश्विनमधील कमेंट वॉर सुरुच, फिल्मी डायलॉगवरील कमेंटला मांजरेकरांचा हटके रिप्लाय, म्हणाले…

रविचंद्रन आश्विन अजून दिग्गज खेळाडू नाही. या मांजरेकरांच्या ट्विटवर आश्विनने मजेशीर मीम फोटो टाकत उत्तर दिले होते. त्या उत्तराला रिप्लाय करत पुन्हा एकदा मांजरेकरांनी आश्विनवर निशाना साधला आहे.

मांजरेकर आणि आश्विनमधील कमेंट वॉर सुरुच, फिल्मी डायलॉगवरील कमेंटला मांजरेकरांचा हटके रिप्लाय, म्हणाले...
संजय मांजरेकर आणि रवीचंद्रन अश्विन

मुंबई : भारताचा उत्त्कृष्ट फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने (Ravichandran Ashwin) संजय मांजरेकरांच्या (Sanjay Manjrekar) दिग्गज खेळाडू मानत नसल्याच्या प्रतिक्रियेला मजेशीर रिप्लाय देत प्रत्युत्तर दिलं होतं. त्या उत्तराला पुन्हा एकदा मांजरेकरांनी रिप्लाय दिला असल्याने हे संपूर्ण ट्विट कमालीचं व्हायरल होत आहे. आधी मांजरेकरांनी ‘आश्विन हा महान खेळाडूंच्या पंगतीत अजून बसत नाही’ अशा आशयाचं ट्विट केलं होतं. ज्याला रिट्विट करत आश्विनने तामिळ चित्रपट अपरिचितमधील एक तामिळ डायलॉगचे मीम पोस्ट केले ज्यात लिहिलं ‘असं नका बोलू, माझं मन दुखतं.’ त्याच फोटोला माजरेकरांनी आता उत्तर दिले आहे. (Sanjay Manjrekar Again replied To Ravichandran Ashwin on Reply Of saying Him Not Greatest of All Time)

मांजरेकरांनी उत्तरामध्ये लिहिले आहे की, ‘चारी, मला साधं सोपं क्रिकेट पाहून वाईट वाटतं. बाहेर सर्वत्र हंगामा होत आहे धडाकेबाज क्रिकेट सुरु आहे. त्यात साधं-सोपं क्रिकेट पाहताना दुख होतं.’ हे असे ट्विट करुन मांजरेकरांनी पुन्हा एकदा आश्विनवर निशाणा साधला आहे. या संपूर्ण ट्विट आणि रिप्लायवर नेटकरी स्वत:ची प्रतिक्रिया नोंदवत असून हे सर्व संभाषण तुफान व्हायरल होत आहे.

याआधीही मांजरेकरांचे आश्विनवर टीकास्त्र

मांजरेकरांनी इएस्पीएन-क्रिकइन्फोचा शो‘रन ऑर्डर’ मध्येही आश्विनबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आश्विनला अजूनही एक दिग्गज खेळाडू म्हटले जाऊ शकत नाही. त्याला तसं संबोधन मला पटत नाही. कारण आश्विनने दक्षिण आफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरोधात एकदाही एका डावात पाच बळी पटकावलेले नाहीत. त्याउलट अक्षरने इंग्लंडविरोधात 5 विकेट्स घेतले होते. त्यामुळे आश्विनला सर्वकालिन महान गोलंदाज म्हटले जाऊ शकत नाही.

हे ही वाचा :

मांजरेकर म्हणाले, ‘अश्विन दिग्गज नाहीच’, फिल्मी डायलॉगने आश्विनकडून मजेशीर प्रत्युत्तर

‘हा’ खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स

रवींद्र जाडेजा आणि पत्नी रीवाबाकडून मदतीचा हात, मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले ‘हे’ काम

(Sanjay Manjrekar Again replied To Ravichandran Ashwin on Reply Of saying Him Not Greatest of All Time)