रवींद्र जाडेजा आणि पत्नी रीवाबाकडून मदतीचा हात, मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले ‘हे’ काम

सध्या रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तो संघासोबत आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि नंतर इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळणार आहे.

रवींद्र जाडेजा आणि पत्नी रीवाबाकडून मदतीचा हात, मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले 'हे' काम
रवींद्र आणि रीवाबा

जयपूर : रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) भारतीय संघातील एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. सध्या संपूर्ण संघासोबत तो इंग्लंडच्या दौऱ्यावर असून महत्त्वाच्या सामन्यांची तयारी करत आहे. 2 जूनला जाडेजा संघासोबत इंग्लंडला रवाना झाला. त्यापूर्वी भारतात असताना त्याने त्याची मुलगी निध्यानाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. त्याचवेळी जाडेजा आणि त्याच्या पत्नी रीवाबाने (Rivaba Jadeja) एक नेक काम करत 5 गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. त्यांनी 5 गरीब कुटुंबाची बचत खाती खोलली. (Ravindra Jadeja And Wife Rivaba Helps Five Poor Families Opened there Post Office Account)

ही सर्व खाती पोस्ट ऑफिसमध्ये खोलण्यात आली. त्यानंतर सर्व खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपयेही जमा केले. ही सर्व खाती त्या-त्या कुटुंबातील मुलींच्या नावावर खोलण्यात आली आहेत. सध्या रवींद्र आणि पत्नी रीवाबा इंग्लंडमध्ये असल्याने पासबुक देण्याचा कार्यक्रम व्हिडीयो कॉन्फ्रेंसिंगद्वारे पार पडला.

रीवाबाने नेत्रदानाचाही घेतलाय निर्णय

रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबा राजकारणात सक्रिय असल्याचे दिसते. तिचे वडील काँग्रेस नेते असले तरी तिने 2019 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केलो होता. ती निवडणूकीदरम्यान भाजपाचा प्रचार करताना ही दिसून आली होती. दरम्यान तिने तिच्या वाढदिवसादिवशी नेत्रदान करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यानंतर आता गरजू कुटुंबाना मदत करत रीवाबा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रवींद्रा-रीवाबाची इंटरेस्टींग लव्ह स्टोरी

रवींद्र आणि रीवाबाची भेट एका पार्टीत झाली होती. रिवाबा ही रवींद्रची बहिण नैनाची मैत्रीण असून तिच्यामार्फतच ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. रीवाबाने राजकोटच्या आत्मिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला आहे. भेटीनंतर 5 फेब्रुवारी 2016 रोजी रवींद्र आणि रीवाबा यांचा ‘जड्डूस फूड फील्ड’ या जाडेजाच्या मालकीच्या रेस्ट्रॉरंटमध्ये साखरपुडा पार पडला. त्यानंतर काही महिन्यातच 17 एप्रिल रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. सध्या जाडेजा भारतीय संघासोबत क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना त्याचे सर्व व्यवसाय रीवाबाच सांभाळते.

हे ही वाचा :

बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडलं, राजेशाही थाटात लग्न, टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूची लव्हस्टोरी

‘हा’ खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

(Ravindra Jadeja And Wife Rivaba Helps Five Poor Families Opened there Post Office Account)