Eshan Malinga कडून अप्रतिम कॅच, ऋषभ पंत आऊट, संजीव गोयंकाची रिएक्शन व्हायरल, पाहा व्हीडिओ

Sanjiv Goenka Reaction Viral After Rishabh Pant Dismissed : ऋषभ पंत याचा फ्लॉप शो सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाला. पंतला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे संजीव गोयंका यांची रिएक्शन व्हायरल झाली आहे.

Eshan Malinga कडून अप्रतिम कॅच, ऋषभ पंत आऊट, संजीव गोयंकाची रिएक्शन व्हायरल, पाहा व्हीडिओ
Sanjiv Goenka Reaction Viral After Rishabh Pant
Image Credit source: Social Media
| Updated on: May 19, 2025 | 10:37 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 61 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौने 20 ओव्हरमध्ये 205 धावा केल्या आहेत. त्यामुळे हैदराबादला 206 धावांचं आव्हान मिळालंय. लखनौसाठी मार्शने सर्वाधिक 65 धावा केल्या. तर मारक्रमने 61 धावांचं योगदान दिलं. तर तिसऱ्या स्थानी आलेल्या कर्णधार ऋषभ पंत याने पुन्हा एकदा निराशा केली. पंतने स्वस्तात आऊट झाला. पंत आऊट झाल्यानंतर एलएसजी फ्रँचायजीचे मालक संजीव गोयंका यांची रिएक्शन व्हायरल झाली आहे.

मार्श आणि मारक्रम या सलामी जोडीने 115 धावांची भागीदारी केली.  मिचेल मार्श 65 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर पंत मैदानात आला. लखनौला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुळे पंतला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र पंतने ही संधी गमावली. श्रीलंकेच्या एशान मलिंगा याने आपल्याच बॉलिंगवर पंतला कॅच आऊट केलं. एशानने पंतचा अप्रतिम कॅच घेतला. एशानच्या या कॅचमुळे पंतला मैदानाबाहेर जावं लागलं. पंतने 6 बॉलमध्ये 1 फोरसह 7 रन्स केल्या.

पंत आऊट होताच गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या गोयंका यांनी तोंड फिरवलं आणि आतमध्ये निघून गेले. गोयंका यांची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गोयंका यांनी पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले आहेत. मात्र पंतला या मोसमात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गोयंका यांची अशी रिएक्शन असणं स्वाभाविक आहे, असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.

पंत आऊट होताच गोंयका निघाले

लखनौसाठी ‘करो या मरो’ सामना

सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने बॉलिंगचा निर्णय घेतला. हैदराबादचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलंय. त्यामुळे हैदराबादचा उर्वरित सामने जिंकून गोड शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौसाठी प्रत्येक सामना हा करो या मरो असा आहे. लखनौला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी एकूण 3 सामन्यांमध्ये विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यानंतरही मुंबई आणि दिल्ली या 2 संघांच्या कामगिरीवर लखनौचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता लखनौ हैदराबाद विरुद्ध जिंकून आपलं आव्हान कायम ठेवणार का? हे देखील काही तासांमध्ये स्पष्ट होईल.