LSG vs SRH : मिचेल मार्श-एडन मारक्रमची अर्धशतकी खेळी, हैदराबादसमोर 206 रन्सचं टार्गेट, लखनौ जिंकणार?
Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad 1st Innings Highlights : लखनौ सुपर जायंट्सने एका भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादसमोर 206 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

मिचेल मार्श-एडन मारक्रम या सलामी जोडीने केलेली शतकी भागीदारी आणि त्यानंतर निकोलस पूरन याने दिलेला फिनिशिंग टच या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. लखनौसाठी मिचेल मार्श, एडन मारकर्म आणि निकोलस पूरन या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर या व्यतिरिक्त इतरांनी निराशा केली. त्यामुळे आता हैदराबाद हे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार? की लखनौ घरच्या मैदनात या धावांचा यशस्वी बचाव करत स्पर्धेतील आव्हान कायम राखणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
हैदराबादची बॅटिंग
हैदराबादने टॉस जिंकला. कर्णधार पॅट कमिन्स याने लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौच्या सलामी जोडीने याचा चांगलाच फायदा घेतला. मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी केली. या दोघांनी 10.2 ओव्हरमध्ये 115 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर मिचेल मार्श आऊट झाला. मार्शने 39 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने सर्वाधिक 65 रन्स केल्या.
मार्श आऊट झाल्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. पंत या सामन्यातही ढेर झाला. पंत 7 रन्स करुन आऊट झाला. पंतनंतर एडन मारक्रम याने निकोलस पूरनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही धावा जोडल्यानंतर मारक्रम आऊट झाला. मारक्रम याने 38 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 61 रन्स केल्या. आयुष बदोनीकडून मोठ्या फटक्यांची आशा होती. मात्र आयुष 3 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर निकोलस पूरन याने अब्दुल समद याच्यासह थोडा वेळ घालवला. पूरनने फटकेबाजी करत लखनौला 200 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र मोक्याच्या क्षणी निकोलस रन आऊट झाला. निकोलसने 26 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 45 रन्स केल्या. शार्दूल ठाकुर याने त्याच्या खेळीतील पहिल्या बॉलवर फोर ठोकला. त्यानंतर दुसऱ्या (वाईड) बॉलवर रन आऊट झाला.
हैदराबादसमोर 206 धावांचं लक्ष्य
Innings Break!#LSG put up 2⃣0⃣5⃣ in a must-win game courtesy of fifties from their openers! 👊
Will #SRH chase this down?
Updates ▶ https://t.co/GNnZh911Xr#TATAIPL | #LSGvSRH | @LucknowIPL pic.twitter.com/2m9ASxUBvW
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2025
शार्दुलनंतर अब्दुल समद यानेही मैदानाबाहेरचा रस्ता धरला.समदने 3 धावा केल्या. तर लखनौच्या डावातील शेवटच्या चेंडूवर आकाश दीप याने सिक्स ठोकला. त्यामुळे लखनौला 205 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून एशान मलिंगा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.