सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रचला इतिहास

| Updated on: Aug 26, 2022 | 11:02 AM

भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप (World Championships) मध्ये इतिहास रचला आहे.

सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रचला इतिहास
sairaj-chirag
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) जोडीने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप (World Championships) मध्ये इतिहास रचला आहे. सात्विक आणि चिराग जोडीने क्वार्टर फायनल मध्ये जपानच्या युगो कोबायाशी आणि ताकुरो होकी जोडीचा तीन गेम्स मध्ये पराभव केला. या विजयाससह सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी जोडीने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पुरुष दुहेरीत हे भारताचं पहिल पदक आहे.

दुसऱ्या गेम मध्ये जपानी जोडीने बाजी उलटवली

क्वार्टर फायनलचा पहिला सामना खूपच रोमांचक होता. भारत आणि जपानच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलं. जपानची जोडी सध्या विद्यमान चॅम्पियन आहे. सात्विक आणि चिराग जोडीने 24-22 असा पहिला गेम जिंकला. पण दुसऱ्या गेम मध्ये जपानी जोडीने बाजी उलटवली. भारतीय जोडी चांगलं प्रदर्शन करु शकली नाही. दुसरा गेम जपानी जोडीने 21-15 असा जिंकला. सामना 1-1 असा बरोरीत होता.

तिसऱ्या गेम मध्ये सुरुवातीपासून आघाडी

तिसऱ्या गेम मध्ये भारतीय जोडी सुरुवातीपासून आघाडीवर होती. भारतीय जोडीने 4-1 अशी आघाडी घेतली होती. तीच आघाडी कायम ठेवत 21-14 असा तिसरा गेम जिंकला व सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. अलीकडेच बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सात्विक आणि चिराग जोडीने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती.