AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिताली राजच्या जीवनावर येणाऱ्या ‘शाबाश मिट्ठू’चा पोस्टर रिलीज

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (International womens day) औचित्य साधून ‘शाबाश मिट्ठू’च्या (Shabaash Mithu) निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज केलं आहे.

मिताली राजच्या जीवनावर येणाऱ्या ‘शाबाश मिट्ठू’चा पोस्टर रिलीज
| Updated on: Mar 08, 2022 | 5:19 PM
Share

मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (International womens day) औचित्य साधून ‘शाबाश मिट्ठू’च्या (Shabaash Mithu) निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. ‘शाबाश मिट्ठू’ हा भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर येणारा बायोपिक आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे. “शतक झळकावल्यानंतर मिताली राजची जी स्टाइल आहे, ती या पोस्टरमधून दाखवण्यात आली आहे. यात तिचा जर्सीनंबर 3 दिसतो. तिने आपल्या बॅटने क्रिकेट बदलून टाकलं. अनेक साचेबंद गोष्टी तिने मोडल्या. ती आजही अनेकांना प्रेरणा देतेय” असे वायकॉम 18 ने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

भारतीय प्रेक्षकांना बॉलिवूड आणि क्रिकेट आवडतं. या चित्रपटद्वारे क्रिकेटपटूंवरील बायोपिकला अजून बळ मिळेल. एमएस धोनीच्या बायोपिकनंतर क्रिकेटपटूंवरील चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. सर्वातआधी सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री कम बायोपिक आला. ‘सचिन – अ बिलियन ड्रीम्स’ असं या डॉक्युमेंट्रीच नाव होतं. हा बायोपिक प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. मागच्यावर्षी पहिल्या वर्ल्डकप विजयावर ’83 द फिल्म’ हा चित्रपट रिलीज झाला. त्याला सुद्धा प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर चाकदा एक्सप्रेस

पुरुष क्रिकेटपटूंनंतर निर्मात्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या आयुष्यावरील चित्रपटांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आता चित्रपट येत आहेत. ‘चाकदा एक्सप्रेस’ हा भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) आयुष्यावरील चित्रपट आहे. अनुष्का या चित्रपटात स्वत: झुलन गोस्वामीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. झुलन गोस्वामीने आयुष्यात कसा संघर्ष केला? तिने यश कसं मिळवलं? त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. यावर्षाच्या सुरुवातीला अनुष्काने या चित्रपटाची घोषणा केली होती. चाकदा एक्सप्रेसच्या निमित्ताने अनुष्का शर्मा बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर परतणार आहे.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.