सचिनने नाव सुचवलं अन् इतिहास घडला, शरद पवारांनी सांगितली महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाची इनसाईड स्टोरी

| Updated on: Sep 22, 2021 | 1:42 AM

धोनीकडे कर्णधारपदाची संधी नेमकी कशी चालून आली ? तो भारतीय संघाच्या कर्णधारपदी कसा विराजमान झाला ? याबद्दलची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.

सचिनने नाव सुचवलं अन् इतिहास घडला, शरद पवारांनी सांगितली महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाची इनसाईड स्टोरी
MAHENDRA SINGH DHONI
Follow us on

पुणे : भारतात क्रिकेटप्रेमींची कमी नाही. महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कर्णधारपद स्वीकारल्यानंतर तर क्रिकेट एक वेगळीच झळाळी मिळाली. त्याची देहबोली, मैदानावर निर्भीडपणे फलंदाजी करण्याची वृत्ती यामुळे त्याचे भारतातच नव्हे तर जगातदेखील चाहते आहेत. भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याने देशाच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र, धोनीकडे कर्णधारपदाची संधी नेमकी कशी चालून आली ? तो भारतीय संघाच्या कर्णधारपदी कसा विराजमान झाला ? याबद्दलची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव सुचवले त्यामुळे धोनीला भारतीय संघाच्या कर्णधारपदी नेमण्याचं ठरलं असं आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. (sharad pawar said how mahendra singh dhoni has appointed as indian cricket team captain)

सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव सुचवले

शरद पवार पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यामागची इनसाईट स्टोरी सांगितली आहे. राहुल द्रविडने कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर नवा कर्णधार म्हणून कोणाला निवडावं यावर बीसीसीआयकूडन विचार केला जात होता. यावेळी सचिन तेंडुलकरचे नाव आघाडीवर होते.

सचिनने कर्णधार होण्यास नकार दिला

मात्र, सचिनला कर्णधारपदाविषयी विचारले असता त्याने नकार दिला. द्रविड तसेच सचिन असे दोघेही कर्णधारपद स्वीकारण्याला तयार नसल्यामुळे आता काय करावे असा प्रश्न कोणाला शरद पवार यांच्या मनात होता. कर्णधारपद नाकारले असले तरी त्यासाटी सचिन तेंडुलकरने महेंद्रसिंग धोनीचं नाव सुचवलं होतं. पुढे धोनीने भारताचं नाव केल्याचं आपल्याला माहिती आहेच, अशा शब्दाच धोनीच्या कर्णधारपदाची इनसाईस्टोरी शरद पवार यांनी सांगितली आहे.

शरद पवार यांच्या मनात सचिन तेंडुलकरचे नाव

आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी राहुल द्रविडने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधारपद कोणाला द्यावे हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांना पडला होता. त्यांच्या मनात सचिन तेंडुलकर तसेच राहुल द्रविड अशी नावे होती. पण सचिनला विचारताच त्याने महेंद्रसिंग धोनीचे नाव सुचवले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीकडे 2007 मध्ये संघाचे कर्णधारपद आले.

इतर बातम्या :

ना राज्यपालांवर बोलले, ना सोमय्यांवर, पवार थेट ललित मोदींवर बोलले! नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर, पवारांचा पत्रकारांच्या प्रश्नावर षटकार !

PBKS vs RR Live Score, IPL 2021 : 17 चेंडूत 43 धावा ठोकून महिपाल बाद, राजस्थानचे 6 गडी बाद

(sharad pawar said how mahendra singh dhoni has appointed as indian cricket team captain)