AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर, पवारांचा पत्रकारांच्या प्रश्नावर षटकार !

सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या सर्व प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील लेटर वॉरवर बोलण्याऐवजी त्यांनी क्रिकेट, क्रिकेट खेळाचा विकास तसेच त्यांची मुंबईबद्दलची आस्था यावर बोलत पत्रकारांच्या प्रश्नांवर षटकार ठोकले आहेत.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर, पवारांचा पत्रकारांच्या प्रश्नावर षटकार !
SHARAD PAWAR
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 8:56 PM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या पत्राला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्राद्वारेच सडेतोड उत्तर दिलंय. ठाकरे आणि कोश्यारी यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपचे बडे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले आहेत. तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांपासून ते आमदार, खासदार असे सगळेच भाजपला चोख प्रत्युतर देण्यात व्यस्त आहेत. सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या सर्व प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील लेटर वॉरवर बोलण्याऐवजी त्यांनी क्रिकेट, क्रिकेट खेळाचा विकास तसेच त्यांची मुंबईबद्दलची आस्था यावर बोलत पत्रकारांच्या प्रश्नांवर षटकार ठोकले आहेत. (sharad pawar denied to talk on governor bhagat singh koshyari and cm uddhav thackeray letter war but frankly spoke on cricket)

खेळाच्या कार्यक्रमात जातो तेव्हा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात माजी क्रिकेपटू चंदू बोर्डे यांच्या कार्याच्या सन्मान समारंभात बोलत होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहारावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यावर न बोलता त्यांनी क्रिकेटविषयी भाष्य केलं. मी कुठल्याही खेळाच्या कार्यक्रमात जातो तेव्हा राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच राजकारणावर बोलत नाही, असे म्हणत त्यांनी राज्यपाल-मुख्यमंत्री लेटर वॉरवर भाष्य करण्याचं टाळलं. मात्र पत्रकारांच्या सर्व प्रश्नांवर मात्र षटकार लगावले.

…नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल

पत्रकारांशी बोलताना “क्रिकेटच्या क्षेत्रात ज्यांची अतिशय चांगली कामगिरी केली. खूपदा जोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत असते. तोपर्यंत लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव असतं. मात्र, त्याचं करिअर संपल्यानंतर त्या खेळाडूकडे दुर्दैवानं पाहिलं जात नाही. पण मला अतिशय आनंद आहे की पुणेकरांनी चंदू बोर्डे यांचं क्रिकेटमध्ये जे योगदान आहे, त्यांची नोंद घेऊन, त्यांची आठवण ठेवून आज त्यांचा सन्मान केला. याच पद्धतीचा दृष्टीकोन ज्यांनी कुठल्याही खेळात योगदान दिलं त्याच्याबद्दल दाखवला तर नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल. भारताचं नावलौकिक या क्षेत्रात वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे,” असे शरद पवार म्हणाले.

मुंबईबद्दल माझी आस्था ही कायम आहे

तसेच आयसीसीच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना त्यांनी मुंबईशी असलेल्या विशेष नात्याविषयी भाष्य केलं. “क्रिकेटच्या क्षेत्रात मी जे वर्ल्ड क्रिकेटचा अध्यक्ष झालो त्याचं कारण मुंबई आहे. मुंबई, मुंबईवरुन बीसीसीआय, बीसीसीआयवरुन एशियन क्रिकेट आणि तिथून आयसीसी अशी माझी सुरुवात मुंबईतून झाली. या कारणामुळे माझी आस्था ही मुंबईसाठी कायम आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस सुधारतेय

भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीवरदेखील त्यांनी मत व्यक्त केलं. “भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस सुधारतेय आणि चांगली होतेय. त्याबद्दल काही वाद नाही,” असं पवार म्हणाले.

राज्यात राज्यपाल-मुख्यमंत्री लेटर वॉरची चर्चा 

दरम्यान, साकीनाका बलात्काराच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. याच पत्रात त्यांनी राज्यातील कायदा, सुव्यवस्था तसेच महिला सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचा उल्लेख केला. कोश्यारी यांच्या या पत्रानंतर ठाकरे यांनीदेखील कोश्यारी यांना जशास तसे उत्तर दिले. त्यांनी कोश्यारी यांना महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्राला पत्र लिहण्याचे सूचवत गुजरात तसेच उत्तराखंडसारख्या राज्यातील महिला अत्याचाराची आकडेवरीच सादर केली. या सर्व प्रकरणावर सध्या राज्यात विरोधक तसेच सत्ताधारी एकमेकांवर खरमरीत टीका करत आहेत.

इतर बातम्या :

उद्धवजींनी पत्र द्यावं, लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो : रावसाहेब दानवे

Defamation Case : शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार, मीडिया प्लॅटफॉर्मचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचे आदेश

करुणा शर्मांचं ‘नो कमेंट’, तर वाल्मिक कराड म्हणतात ‘विषय संपला आता चला’, नेमकं काय घडतंय ?

(sharad pawar denied to talk on governor bhagat singh koshyari and cm uddhav thackeray letter war but frankly spoke on cricket)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...