करुणा शर्मांचं ‘नो कमेंट’, तर वाल्मिक कराड म्हणतात ‘विषय संपला आता चला’, नेमकं काय घडतंय ?

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: |

Updated on: Sep 21, 2021 | 7:30 PM

करुणा शर्मा यांना आज अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल 16 दिवस आणि 15 रात्र करुणा शर्मा यांनी कोठडीत घालवले. आज बीडच्या जिल्हा कारागृहातून करुणा शर्मा अगदी हसत बाहेर पडल्या. यावेळी माध्यमांनी घेरलं असता "नो कमेंट" म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.

करुणा शर्मांचं 'नो कमेंट', तर वाल्मिक कराड म्हणतात 'विषय संपला आता चला', नेमकं काय घडतंय ?
करुणा शर्मा

Follow us on

बीड : करुणा शर्मा यांना आज अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल 16 दिवस आणि 15 रात्र करुणा शर्मा यांनी कोठडीत घालवले. आज बीडच्या जिल्हा कारागृहातून करुणा शर्मा (Karuna Sharma) अगदी हसत बाहेर पडल्या. यावेळी माध्यमांनी घेरलं असता “नो कमेंट” म्हणत त्यांनी काढता पाय घेतला. तेवढ्यात वाल्मिक अण्णा कराड यांचं “विषय संपला आता चला” असं वाक्य सर्वांच्या कानावर पडलं. याच वाक्यानंतर करुणा शर्मा भरधाव वेगात मोटारीत बसून मार्गस्थ झाल्या. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक अण्णा कराड (Valmik Anna Karad) यांना पाहिले जाते. त्यांनी केलेल्या वक्तव्याची जिल्हाभरात चर्चा सुरू झालीय. (karuna sharma grant bail after spending 16 days in judicial custody people people thinking on Valmik Anna Karad statement)

16 दिवस, 15 रात्र कोठडीत

करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अखेर आज 21 सप्टेंबर रोजी त्यांना जामीन मिळाला. करुणा शर्मा यांनी बीडच्या जिल्हा कारागृहात 16 दिवस, 15 रात्र म्हणजेच तब्बल 384 तास काढले आहेत.

कैदी नंबर 872

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाताना करुणा शर्मा नाराज दिसून आल्या होत्या. करुणा शर्मा यांनी कोठडीच्या काळात एका पुस्तकाचेदेखील वाचन केले आहे. मात्र पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. गणेशोत्सव काळात करुणा यांनी हरतालिकेच्या दिवशी उपवास धरला होता. त्यादिवशी त्यांनी केवळ पाणी घेतल्याचे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. करुणा या 872 व्या कैदी ठरल्या आहेत. कोठडीतून सुटका झाल्यानंतर करुणा हसत बाहेर पडल्या.

करुणा शर्मा यांना 14 दिवसांची कोठडी

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा  यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. शर्मा यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. 5 सप्टेंबर रोजी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा आणि त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

इतर बातम्या :

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र

‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा नारा

25 फुटाच्या भिंतीवरुन उडी, हत्येच्या ओरपातील जेरबंद आरोपीचे पलायन, तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर ?

(karuna sharma grant bail after spending 16 days in judicial custody people people thinking on Valmik Anna Karad statement)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI