25 फुटाच्या भिंतीवरुन उडी, हत्येच्या आरोपातील जेरबंद आरोपीचे पलायन, तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर ?

भांडुप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या संजय यादव नामक आरोपीने पलायन केले आहे. कारागृहातील गार्डची नजर चुकवून 25 फूट उंच असलेल्या सुरक्षा भिंतीवरुन उडी टाकून आरोपीन पलायन केले आहे.

25 फुटाच्या भिंतीवरुन उडी, हत्येच्या आरोपातील जेरबंद आरोपीचे पलायन, तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर ?
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 10:28 PM

नवी मुंबई : भांडुप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या संजय यादव नामक आरोपीने पलायन केले आहे. कारागृहातील गार्डची नजर चुकवून 25 फूट उंच असलेल्या सुरक्षा भिंतीवरुन उडी टाकून आरोपीन पलायन केले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या आरोपीसह त्याच्यासोबत पळून जाताना पकडला गेलेल्या आरोपीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Undertrial sanjay yadav escape from taloja jail police files case)

पळून गेलेला आरोपी हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार पळून गेलेला आरोपी संजय यादव हा भांडूप येथील रहिवासी आहे. 2018 मध्ये भांडूपमध्ये झालेल्या एका 17 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात त्याला भांडूप पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संजय यादव याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यातआली होती. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी संजय यादव आणि राहुल जैस्वाल दोघेही औषध घेण्याच्या बहाण्याने आपल्या बॅरिकेटमधून बाहेर पडले होते.

25 फूट उंच भिंतीवर चढून उडी टाकली

त्यानंतर दोघेही जेलमधील रुग्णालयाजवळ गेले असताना, तेथील वॉच टॉवरवर गार्ड नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोघेही वॉच टॉवरच्या जाळीचा दरवाजा उघडून वॉच टॉवरवर चढले. त्यानंतर संजय यादव याने वॉच टॉवरला लागून असलेल्या तळोजा जेलच्या 25 फूट उंच भिंतीवर चढून तेथून बाहेर उडी टाकून पलायन केले.

पळून जाणाऱ्या दुसऱ्या साथीदारास पकडण्यात पोलीस यशस्वी 

यावेळी त्याच्यासोबत असलेला राहुल जैस्वाल हा दुसरा आरोपी भिंतीवरुन उडी टाकण्यास घाबरल्याने तो वॉच टॉवरवरच थांबला. हा प्रकार वॉच टॉवरवर तैनात असलेल्या गार्डच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तत्काळ राहुल जैस्वाल याला पकडले. तसेच पळून गेलेल्या संजय यादव याची माहिती जेल प्रशासनाला दिली. त्यानंतर कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी भिंतीवरुन उडी टाकून पळून गेलेल्या संजय यादव याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांना सापडला नाही.

पळून गेलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल

त्यानंतर पोलिसांनी संजय यादव राहत असलेल्या भांडूप येथील घरी जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तेथेही तो सापडला नाही. त्यामुळे तळोजा जेल प्रशासनाच्या वतीने पळून गेलेला आरोपी संजय यादव आणि त्याच्यासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला राहुल जैस्वाल या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हत्येसारख्या गुन्ह्यात आरोपी असलेला कैदी पळून जाण्यास यशस्वी ठरल्यामुळे मोठी टीका केली जात आहे. तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

इतर बातम्या :

आधी बिअर पाजली, नंतर मरेपर्यंत ट्रकखाली चिरडलं, सोबत राहण्याचा हट्ट धरणाऱ्या प्रेमिकेचा शेवटी काटा काढला

आईची स्क्रुड्रायव्हरने हत्या, अडीच वर्षांपासून फरार, शेअर मार्केटचं वेड लागलेल्या ‘त्या’ तरुणाला अखेर बेड्या

इलेक्ट्रिक हिटर छातीला कवटाळून आयुष्य संपवलं, विवाहितेच्या आत्महत्येने पुणे हादरलं

(Undertrial sanjay yadav escape from taloja jail police files case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.