आधी बिअर पाजली, नंतर ट्रकखाली चिरडलं, प्रियकर-प्रेयसीत नेमकं असं का घडलं?

उत्तर प्रदेशामधील बिजनौर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंध असल्यामुळे सोबत राहण्याचा हट्ट करत असलेल्या महिलेची चक्क बिअर पाजून डॉडने हत्या करण्यात आली आहे. नफीस अहमद असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आधी बिअर पाजली, नंतर ट्रकखाली चिरडलं, प्रियकर-प्रेयसीत नेमकं असं का घडलं?

लखनौ : उत्तर प्रदेशामधील बिजनौर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंध असल्यामुळे सोबत राहण्याचा हट्ट करत असलेल्या महिलेची चक्क बिअर पाजून रॉडने हत्या करण्यात आली आहे. नफीस अहमद असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने महिलेला आधी बिअर पाजून नंतर रॉडने डोक्यावर मारले. तसेच महिलेला ट्रकखाली चिरडून अपघात असल्याचे भावसण्याचा प्रयत्न केला. आपणच महिलेची हत्या केल्याचे आरोपी नफीसने मान्य केले असून एकच खळबळ उडाली आहे. (boyfriend nafiz made his girlfriend to drink beer murdered with rod crushed under truck)

छिन्नविछिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह

हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आपले सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल हायवे 74 येथे जिकरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे महिलेची ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र, सखोल तपास केल्यानंतर हत्या झालेली महिला उत्तराखंड राज्यातील असल्याचे समोर आले. तपासात नंतर आरोपी नफीसचेही नाव आले होते. ज्या ट्रकमध्ये मोनिकाची (नाव बदलले आहे) हत्या झाली होती त्यामध्ये रक्ताचे डाग असलेला एक रॉड आढळला होता. तसेच ट्रकच्या चाकालाही रक्त लागलेले होतं. अशा संशयास्पद गोष्टी आढळून आल्यानंतर नफीसवर पोलिसांचा संशय बळावला. नफीसला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

प्रेमसंबंधामुळे सोबत राहण्याचा करत होती हट्ट

मिळालेल्या माहितीनुसार मोनिका (नाव बदलले आहे) आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. मोनिकाची 2018 मध्ये काशीपूरमध्ये कपड्याचं दुकान असलेल्या नफीसशी भेट झाली होती. त्यानंतर नफीसने तिला नवा मोबाईल नंबर दिला होता. तसेच ओळख वाढल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. कालांतराने मोनिका नफीससोबत राहण्याचा हट्ट करु लागली. मोनिकाचा हट्ट वाढत गेल्यानंतर नफीसने तिचे लग्न ओळखीच्या एका माणसासोबत लावून दिले. मात्र तिथेही न राहता मोनिका दहा दिवसांत परत आली. तसेच एका रात्री नफीसवळ परत येण्याचा हट्ट करु लागली.

शेवटी महिलेला बिअर पाजून ट्रकखाली चिरडलं 

मोनिकाचा हट्ट वाढत गेल्यानंतर नफीसने शेवटी तिचा काटा काढण्याचे ठरवले. मी तुला घेऊन जाण्यासाठी ट्रकने येत आहे, असे नफीसने मोनिकाला सांगितले. काशीपूरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने नसीफ मोनिकाला ट्रकमधून घेऊन गेला. ट्रकमध्ये बसल्यावर रस्त्यातच त्याने तिला बिअर पाजली. तसेच नंतर ट्रकमध्ये असलेल्या रॉडने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मोनिका जागेवरच गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. नफीस एवढ्यावरच थांबला नाही. नफीसने तिला ट्रकच्या चाकाजवळ टाकले. तसेच तिच्या अंगावरुन अनेकवेळा ट्रक फिरवला. नफीसने मोनिकाचा मृतदेह चाकाखाली चिरडला.

दरम्यान, हे थरारक हत्याकांड उघड झाल्यानंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. महिलेला बिअर पाजून तिची हत्या करण्याच्या या विकृतीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

इतर बातम्या :

आईची स्क्रुड्रायव्हरने हत्या, अडीच वर्षांपासून फरार, शेअर मार्केटचं वेड लागलेल्या ‘त्या’ तरुणाला अखेर बेड्या

नाकाबंदीवेळी बाईकस्वाराच्या डोक्यावर पोलिसाची काठीने मारहाण, युवक गंभीर जखमी

पैलवानांच्या मदतीने साडेसात किलो सोन्याची लूट…तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज…चोरों का राजा नाशिकचा

(boyfriend nafiz made his girlfriend to drink beer murdered with rod crushed under truck)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI