वाद दुसऱ्या पत्नीसोबत, पतीने पहिल्या बायकोच्या मुलाचा प्लॅटफॉर्मवर डोकं आपटून जीव घेतला

पत्नीशी झालेल्या वादातून एका बापाने आपल्याच चार वर्षीय मुलाची डोके आपटून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सानपाड्यात ही घटना घडली आहे. दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून सानपाडा रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक तीनवर या निर्दयी बापाने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून त्याची हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुलाची हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी यांनी अटक केली आहे.

वाद दुसऱ्या पत्नीसोबत, पतीने पहिल्या बायकोच्या मुलाचा प्लॅटफॉर्मवर डोकं आपटून जीव घेतला
Navi Mumbai Crime

नवी मुंबई : पत्नीशी झालेल्या वादातून एका बापाने आपल्याच चार वर्षीय मुलाची डोके आपटून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नवी मुंबईतील सानपाड्यात ही घटना घडली आहे. दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून सानपाडा रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक तीनवर या निर्दयी बापाने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून त्याची हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुलाची हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी यांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

सानपाडा रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक 3 आणि 4 दरम्यान हा प्रकार घडला आहे. आरोपी बाप भटक्या कुटुंबातील आहे. आरोपी बाप आणि त्याच्या पत्नीचे नेहमी वाद होत होते. हे दोघे भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहोचले यावेळी फलाटावर एकत्र चालत असताना आरोपीचा पत्नीसोबत वाद सुरु होता. या वादातून त्याने स्वतःच्या चार वर्षांचा मुलाला उचलून फलाटावर आपटले.

यावेळी काही व्यक्तींनी त्याला अडविण्याचाही प्रयत्नही केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. हा बाप आपल्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे उचलून खाली फेकत होता. अखेर हा क्रूर प्रकार पाहून एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही आरोपी बाप हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिल्याने जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मृत हा आरोपी बापाच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा होता. त्याची पहिली पत्नी गावी असून, तो सध्या दुसऱ्या पत्नीसोबत नवी मुंबईत सानपाडाला राहत होता. रविवारी रात्रीपासून आरोपीचा दुसरी पत्नीसोबत वाद सुरु होता. सोमवारी सकाळी सर्वजण सानपाडा स्थानकात आले असता त्या ठिकाणीही त्यांचा वाद सुरु होता. याच रागातून आरोपी बापाने मुलाला उचलून आपटून त्याची हत्या केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

डोंगरावर नेऊन दिराचा वहिनीवर बलात्कार, ओढणीने गळा दाबून हत्या, पुण्यात खळबळ

सराईत गुंड जावेद अन्सारीची नालासोपाऱ्यात दहशत, पोलिसांकडून त्याच परिसरात धिंड?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI