सराईत गुंड जावेद अन्सारीची नालासोपाऱ्यात दहशत, पोलिसांकडून त्याच परिसरात धिंड?

सोमवारी दुपारच्या सुमारास अन्सारीला आपल्याच परिसरात हातकडी घालून पोलीस फिरवत होते. यावेळी अन्सारीच्या दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि छुप्या पद्धतीने त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.

सराईत गुंड जावेद अन्सारीची नालासोपाऱ्यात दहशत, पोलिसांकडून त्याच परिसरात धिंड?
नालासोपाऱ्यात गुंडाची धिंड

पालघर : स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी नालासोपारा पूर्व परिसरात जावेद अन्सारी हा गुंड दहशत पसरवत होता. अन्सारीला त्याच्याच परिसरात हातकडी घालून खुलेआम फिरवत अक्षरशः धिंड काढण्यात आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी मात्र ही धिंड नसून त्याला गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी नेल्याचा दावा केला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास अन्सारीला आपल्याच परिसरात हातकडी घालून पोलीस फिरवत होते. यावेळी अन्सारीच्या दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि छुप्या पद्धतीने त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.

काय आहे प्रकरण?

सराईत गुंड जावेद अन्सारी याच्यावर मारहाण, प्राणघातक हल्ला, अपहरण, बलात्कार, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे यासह अन्य स्वरुपाचे 12 च्या वर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला 15 दिवसांपूर्वी वसई न्यायालयाने फरार घोषित केले होते.

जावेद अन्सारीला पोलीस कोठडी

16 सप्टेंबर रोजी तुलिंज पोलिसांनी मुंबईच्या वाकोला परिसरातून त्याला अटक केली. अटक करुन न्यायालयात हजर केले असता, वसई न्यायालयाने त्याला 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या कोठडीत असताना तुलिंज पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीच्या गुन्ह्यातील एका तपासात बाहेर काढून ज्या परिसरात जावेद अन्सारी दहशत पसरवत होता, त्याच नालासोपारा पूर्व गालानगर, शिर्डी नगर परिसरात बेड्या घालून फिरवले आहे.

धिंड काढल्याची चर्चा पोलिसांनी फेटाळली

अन्सारीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारचे आवरण घातले नव्हते. संपूर्ण परिसरात फिरवत असताना नागरिकांनी त्याचे चित्रीकरण करत समाज मध्यामंवर व्हायरल केले. तसेच या गुंडाची दहशत कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी पोलिसांनी गुंडाची धिंड काढली, अशी चर्चा समाज माध्यमांवर पसरली आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा न देता आम्ही धिंड वगैरे काही काढली नसून एका गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी घेऊन गेलो होतो, असे सांगितले आहे.

पिंपरीतही गावगुंडांची धिंड

याआधी, पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी धिंड काढली होती. जिथे ही घटना घडली, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींची धिंड काढल्याचं समोर आलं होतं. पिंपळे निलखच्या ज्या रस्त्यावर दारु पिऊन प्रतीक खरात, चेतन जावरे यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून कोयत्याने मारहाण केली होती, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी या दोन्ही आरोपीची धिंड काढून चांगलाच धडा शिकवला. मात्र सांगवी पोलिसांशी संपर्क साधला असता त्या आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी गेलो असता कुणी तरी व्हिडीओ तयार केला, असा दावा केला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO | पिंपरीत कोयता उगारुन गावगुंडांची नागरिकांना मारहाण, त्याच रस्त्यावर पोलिसांकडून आरोपींची धिंड?

VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI