AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नाना पटोलेंनी यावेळी विविध मुद्यावर भूमिका मांडली. नीट परीक्षेमध्ये उघड झालेल्या गैरप्रकारांवर त्यांनी बोट ठेवलं.

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 5:33 PM
Share

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नाना पटोलेंनी यावेळी विविध मुद्यावर भूमिका मांडली. नीट परीक्षेमध्ये उघड झालेल्या गैरप्रकारांवर त्यांनी बोट ठेवलं. नीट परीक्षेला देशभरातून जवळपास 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी नागपूर असेल जयपूर अशा ठिकाणी हा पेपर लीक झाला. या घटनेमुळं अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तामिळनाडूनमध्ये राज्य सरकारनं नीट बंद करून बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्रात व्हावा यासाठी भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासदंर्भात मागणी केली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय

अनेक ठिकाणी NEET गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. ही परीक्षा NCERT च्या बेसवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणूनच महाराष्ट्राने देखील तामिळनाडूप्रमाणे बारावीच्या बेसवर मेडीकलला प्रवेश देण्याची भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसच पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

तामिळनाडूचा निर्णय काय?

नीट यूजी परीक्षेच्या 19 तासांपूर्वी दक्षिणेकडील प्रमुख राज्य तामिळनाडूत एका विद्यार्थ्यानं परिक्षा होण्यापूर्वी आत्महत्या केली, पुन्हा परीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीनं देखील आत्महत्या केली. तामिळनाडूतील एका विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेत तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारं विधेयक मांडण्यात आलं. तामिळनाडूतील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देत विधेयक मंजूर केलं. तामिळनाडूमध्ये आता 12 वीच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल.

तामिळनाडूचा नीटला विरोध जुनाच

2013 पूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देश पातळीवर ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय प्रवेशासाठीची ही परीक्षा बदलून राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. 2016 मध्ये सुप्रीम कोर्टानं नीट परीक्षेला दिलेली स्थगिती उठवली. तेव्हापासूनच नीट परीक्षेला तामिळनाडूतील राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केला आहे. तामिळनाडूमध्ये जय ललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाची सत्ता असताना देखील नीट परीक्षा विरोधी प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, राष्ट्रपतींची मंजुरी न मिळाल्यानं तो प्रस्ताव अंमलात आला नव्हता.

इतर बातम्या:

NEET PG Admit Card : नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

NEET 2021 : नीट यूजी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी याचिका, सुप्रीम कोर्टाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, परीक्षा कधी होणार?

Maharashtra Congress State President Nana Patole demanded Maharashtra should follow Tamilnadu decision of cancel NEET wrote letter to Uddhav Thackeray

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.