Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शार्दुल ठाकुरला टीम इंडियातून वगळल्यानंतर धरली पृथ्वी शॉची वाट, असा निर्णय घेण्याचं कारण की…

अष्टपैलू शार्दुल ठाकुर 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2025 स्पर्धेच्या लिलावातही त्याला घेण्यात कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. त्यामुळे आता त्याने पृथ्वी शॉच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शार्दुल ठाकुरला टीम इंडियातून वगळल्यानंतर धरली पृथ्वी शॉची वाट, असा निर्णय घेण्याचं कारण की...
Follow us
| Updated on: Feb 18, 2025 | 6:44 PM

अष्टपैलू शार्दुल ठाकुर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. रणजी स्पर्धेत मुंबईचा संघ जेव्हा अडचणीत आला तेव्हा त्याने त्याच ताकदीने संघाचा तारणहार ठरला. पण शार्दुल ठाकुर गेल्या एक वर्षापासून टीम इंडियाचा भाग नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याला वारंवार डावललं जात आहे. त्यामुळे टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी शार्दुल ठाकुर देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात सुरु आहे. या सामन्यात शार्दुल ठाकुर टीमसाठी जे काही शक्य आहे ते करत आहे. असं असताना सामना सुरु असताना एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई संघाचा सहकारी असलेल्या पृथ्वी शॉच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहिलं तर दोघेही टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यांना आयपीएल संघातही स्थान मिळालं नाही. त्यामुळे पुढचे दोन महिने आणखी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे टीम इंडियात पदार्पणासाठी पृथ्वी शॉने एक निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे. असाच निर्णय शार्दुल ठाकुर घेण्याचा तयारीत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, शार्दुल ठाकुर काउंटी चॅम्पियन्शिपसाठी एसेक्स संघाचा भाग असेल. शार्दुल ठाकुरचा हा निर्णय त्याच्या पथ्यावर पडू शकतो. कारण जून महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इतकंच काय कसोटीसाठी टीमची पुर्नबांधणी केली जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माऐवजी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची धुरा असेल असं सांगण्यात येत आहे. दरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये शार्दुल ठाकुरची कामगिरी चांगली राहिली तर त्याला संघात स्थान मिळू शकते. अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याचा नावाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे आता त्याचा हा निर्णय कितपत योग्य ठरतो ते दोन महिन्यानंतर कळेल.

शार्दुल ठाकुर टीम इंडियासाठी 11 कसोटी, 47 वनडे आणि 25 टी20 सामने खेळला आहे. या दरम्याने त्याने 129 विकेट घेतल्या आहेत. तर 5 अर्धशतकाच्या मदतीने 729 धावा केल्या आहेत. शार्दुल 2023 पर्यंत टीम इंडियातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. पण त्यानंतर त्याला संघात परत स्थान मिळालं नाही.

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.