IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

| Updated on: Jun 11, 2021 | 9:18 AM

आयपीएलच्या 14 व्या मोसमात दिल्लीकडून खेळताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ने सलामीला येऊन कशी खेळी करायची असते आणि संघाला कशा पद्धतीने मजबूत सुरुवात करुन द्यायची असते, याचा धडा घालून दिला. त्यामुळे या दौऱ्यात शिखरच्या साथीला पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे. | Shikhar Dhawan Prithvi Shaw

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा...
भारताचा श्रीलंका दौरा
Follow us on

मुंबई : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India tour of Sri Lanka) घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने एकूण 20 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंचा आपआपसात अधिक सराव व्हावा आणि अनेक पर्याय उपलब्ध असावेत या उद्देशाने बीसीसीआयने तगडा संघ जाहीर केला. या संघात सलामीवीरांच्या जागेसाठी एकूण चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये स्वत: शिखर धवन (Shikhar Dhawan), पृथ्वी शॉ (prithvi Shaw), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) यांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमात दिल्लीकडून खेळताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ने सलामीला येऊन कशी खेळी करायची असते आणि संघाला कशा पद्धतीने मजबूत सुरुवात करुन द्यायची असते, याचा धडा घालून दिला. त्यामुळे या दौऱ्यात शिखरच्या साथीला पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे. (Shikhar Dhawan Prithvi Shaw Ruturaj gaikwad and Devdutt Padikkal Who will open india tour of Srilanka 2021)

सलामीवीर कोण?

स्वत: शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश आहे. चारही जणांनी आयपीएलच्या गतमोसमात आणि यंदाच्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली होती. यापैकी शिखर आणि पृथ्वीने तर यंदाच्या आयपीएल मोसमात कहल केला. सर्व फ्रेचायजींपैकी दिल्लीकडून सलामीला खेळणाऱ्या शिखर-पृथ्वीने सलामीवीर जोडीचा नवा अध्याय दिला. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सर्वाधिक यशस्वी सलामीवीर म्हणूनही शिखर-पृथ्वीचं नाव घ्यावं लागेल. दोघांचीही लय इतकी उत्तम जमते की पहिल्या काही षटकांतच संघाची धावसंख्या कधी अर्धशतक ओलांडते ती देखील कळत नाही. त्यात राईट-लेफ्टचं कॉम्बिनेशन… प्रतिस्पर्धी टीम आणखीनच त्रस्त…. दोघंही आक्रमक पद्धतीचे खेळाडू… त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात शिखरच्या साथीला पृथ्वी नक्की मैदानात सलामीला येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे देवदत्त पडीक्कलने बंगळुरुकडून खेळताना आपल्या बॅटिंगची जादू दाखवून दिलीय. या आयपीएल मोसमात तर त्याने राजस्थानविरुद्ध दणकेबाज शतक ठोकलं. तसंच मयांकच्या साथीने देवदत्त बंगळुरुला चांगली सुरुवात करुन देत असतो. चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज बाबतीत बोलायचं झालं तर त्यानेही आपल्या बॅटची नजाकत अनेकदा दाखवून दिलीय. अंतिम 11 मध्ये संधी मिळाली तर ऋतुराज आणि देवदत्त चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील.

मधल्या फळीत कोण?

सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक) असे एकाहून एक बॅट्समनाची टोळी मधल्या फळीत असणार आहे. या सगळ्यांना आयपीएलच्या 14 व्या पर्वात म्हणावी अशी कामगिरी करण्यात अपयश आलं. मात्र ते अपयश पुसण्याची आता नामी संधी आहे. भारताला श्रीलंकेच्या भूमीत जर विजय मिळवायचा असेल तर मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी भूमिका पार पाडावी लागेल.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

(Shikhar Dhawan Prithvi Shaw Ruturaj gaikwad and Devdutt Padikkal Who will open india tour of Srilanka 2021)

हे ही वाचा :

IND vs SL : युजवेंद्र चहल ते कुलदीप यादव, फिरकीच्या जोडीला दीपक-नवदीपचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?