AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar “भावा, माझं रेकॉर्ड तोडण्याच्या या भानगडीत तू उगाच स्वत:ची हाडं मोडून घेशील” – शोएब अख्तर अखेर का असं म्हणाला?

मात्र त्याने रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नात त्याने स्वत:ची हाडं तोडून घेऊ नये. म्हणजे त्याने फिट रहावं असा माझा अर्थ आहे", असं अख्तर म्हणाला.

Shoaib Akhtar भावा, माझं रेकॉर्ड तोडण्याच्या या भानगडीत तू उगाच स्वत:ची हाडं मोडून घेशील - शोएब अख्तर अखेर का असं म्हणाला?
| Updated on: Jan 04, 2023 | 9:15 PM
Share

मुंबई : ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकने (Umran Malik) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला. उमरानने या सामन्यात 150 किमी पेक्षा अधिक वेगाने बॉल टाकला. उमरानने हा कारनामा श्रीलंकेच्या डावातील 17 व्या ओव्हरमध्ये केला. उमरानने 155 किमी वेगाने बॉल टाकला. या बॉलवर उमरानने दासून शनाकाला (Dasun Shanka) आऊट केलं. इतकंच नाही तर उमरानने जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक केला. (shoaib akhtar says if team india umran malik break my fastet delivery record then i will happy)

उमरान आता टीम इंडियाकडून वेगाने बॉल टाकणारा गोलंदाज ठरलाय. याआधी उमरानने दिल्ली विरुद्ध 157 किमीच्या वेगाने बॉल टाकून सर्वांचंच लक्ष वेधलं होतं.

आता टार्गेट शोएब अख्तर

उमरानसमोर आता वेगवान बॉल टाकणाऱ्या शोएब अख्तरच्या रेकॉर्ड आहे. शोएबने 2002 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 161.3 किमी वेगाने बॉल टाकला होता.

अख्तर उमरानबबात काय म्हणाला?

“उमरानने माझा रेकॉर्ड ब्रेक केला तर मला आनंद होईल. मात्र त्याने रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नात त्याने स्वत:ची हाडं तोडून घेऊ नये. म्हणजे त्याने फिट रहावं असा माझा अर्थ आहे”, असं अख्तर म्हणाला. “नशिबाची साथ असेल तर नक्कीच हा विक्रम मी मोडित काढेन”, असं उमरान याआधी म्हणाला होता.

दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला टी 20 सामन्यात 2 धावांनी थरारक विजय मिळवला. या सामन्यात उमरानने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. दुसरा टी 20 सामना 5 जानेवारीला पुण्यात खेळवण्यात येणार आहे. उमरानकडून दुसऱ्या टी 20 मध्ये यापेक्षाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.