AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब मलिक आता चौथं लग्न करणार? सानिया मिर्झानंतर आता सना जावेदलाही घटस्फोट? नवी पत्नी कोण?

Shoaib Malik Fourth Marriage : शोएब मलिकने 2023 मध्ये भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला घटस्फोट दिला होता, त्यानंतर त्याने सना जावेदशी लग्न केले होते. आता शोएब चौथे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शोएब मलिक आता चौथं लग्न करणार? सानिया मिर्झानंतर आता सना जावेदलाही घटस्फोट? नवी पत्नी कोण?
Shoaib MalikImage Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 9:00 PM
Share

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. शोएबने 2023 मध्ये भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर 2024 च्या सुरुवातीला शोएब मलिकने सना जावेदशी लग्न केल्याची माहिती दिली होती. अशातच आता शोएब मलिक लवकरच पाकिस्तानी अभिनेत्री वनीजा सत्तारशी लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता शोएबने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चौथ्या लग्नाबाबत समोर आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. तसेच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाला शोएब मलिक?

शोएब मलिकने म्हटले की, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्यासोबतचे नाते 2023 च्या सुरुवातीला परस्पर संमतीने संपवले होते. या घटस्फोटानंतरच जानेवारी 2024 मध्ये अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएब पुढे म्हणाला की, मी माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवू इच्छित होता, परंतु लोकांनी याचा गैरफायदा घेतला. माझ्या सध्याच्या पत्नीला अशा गोष्टींसाठी लक्ष्य केले जात आहे ज्यांचा तिचा काहीही संबंध नाही. माझा मुलगा इझान मिर्झा मलिक सोशल मीडियावरील बातम्या वाचत आहे. लाईक्स आणि व्ह्यूजसाठी खोटे बोलणे अत्यंत चुकीचे आहे.

कोण आहे वनीजा सत्तार?

शोएब मलिकचे नाव वनीजा सत्तारशी जोडले जात आहे. वनीजा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती “लाडली” या लोकप्रिय शोमधून लोकप्रिय झाली आहे. ती कराचीची रहिवासी आहे, तिने कराची विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. तिचे इंस्टाग्रामवर सव्वा लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वारंवार अपडेट्स शेअर करत असते. तसेच काही लोक शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्री लैबा खानशीही जोडत आहेत.

शोएब मलिकने आतापर्यंत तीनवेळा केले लग्न

शोएब मलिकने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला आयेशा सिद्दीकीशी लग्न केले होते. कुटुंबाच्या संमतीने झालेले हे लग्न वादग्रस्त ठरले. आयेशाने आरोप केला की शोएबने गुप्तपणे दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते, मात्र शोएबने हे आरोप नाकारले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर एप्रिल 2010 मध्ये शोएबने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले. या दोघांना इझान नावाचा मुलगा आहे. मात्र कालांतराने दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला. जानेवारी 2024 मध्ये लग्नाच्या 13 वर्षांनंतर मलिक आणि सानियाने घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. आता त्याच्या चौथ्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार