AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer : अर्ध्या रात्री आला फोन…! श्रेयस अय्यरचा दुसऱ्या वनडेतून पत्ता कट? नेमकं काय घडलं?

भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना भारताने 4 विकेट राखून जिंकला. या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त खेळी केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आणि भारताचा विजय सोपा झाला. पण दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत अजून काहीच स्पष्ट नाही.

Shreyas Iyer : अर्ध्या रात्री आला फोन...! श्रेयस अय्यरचा दुसऱ्या वनडेतून पत्ता कट? नेमकं काय घडलं?
| Updated on: Feb 07, 2025 | 3:18 PM
Share

श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. या संधीचं श्रेयस अय्यरने सोनं केलं. त्याने 36 चेंडूत 59 धाव केल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. यावेळी त्याने 9 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मारले. हा सामना जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने एक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडावर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. श्रेयस अय्यरने सांगितलं की, नागपूर वनडेत त्याला संघात स्थान मिळणं कठीण होतं. पण विराट कोहली अनफिट असल्याने जागा मिळाली. श्रेयस अय्यरने प्लेइंग 11 मध्ये कसं स्थान मिळालं याबाबतचा खुलासा देखील केला. श्रेयस अय्यरने सांगितलं की सामन्यापूर्वी चित्रपट पाहात होतो. श्रेयस अय्यरने सांगितलं की, ‘मी विचार करत होतो की थोडा आणखी काही वेळ चित्रपट पाहतो. पण त्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा मला कॉल आला. त्याने मला सांगितलं की, कदाचित तू खेळू शकतो. कारण विराट कोहलीचा गुडघ्याला सूज आली आहे. यानंतर मी रुममधून पळालो आणि जाऊन लगेच झोपलो.’ श्रेयस अय्यरने हा खुलासा केल्यानंतर दुसऱ्या वनडेत जागा मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

श्रेयस अय्यरने खुलासा केल्यानंतर ही बाब स्पष्ट आहे की, तो टीम इंडियाच्या प्लान ए चा भाग नाही. म्हणजेच टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये त्याची जागा बनत नाही. त्यामुळे कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेत अय्यरला खेळवणार की नाही असा प्रश्न आहे. अय्यरने अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे टीम इंडिया प्लान बीवर कायम राहते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने कमबॅक केलं तर टीम इंडियातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे टीम इंडिया यशस्वी जयस्वालला ड्रॉप करून गिलला ओपनिंगला पाठवणार का? तसेच विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरला तर अय्यरचा जागा संघात होईल, असं गणित क्रीडाप्रेमी मांडत आहेत.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.