बीसीसीआयच्या ‘त्या’ खेळीनंतर दिग्गज प्लेयर्स आला वठणीवर, रणजी स्पर्धेत उपांत्य फेरीत खेळणार!

| Updated on: Feb 27, 2024 | 5:27 PM

भारतीय दिग्गज क्रिकेटपटू देशांतर्गत रणजी स्पर्धेला दुय्यम स्थान देत असल्याचं दिसून आलं आहे. बीसीसीआयने वारंवार ताकीद देऊनही केराची टोपली दाखवली होती. अखेर बीसीसीआयने इंगा दाखवताच दिग्गज खेळाडू वठणीवर आला आहे. तसेच रणजी स्पर्धेत उपांत्य फेरी खेळण्याची तयारी सुरु केली आहे.

बीसीसीआयच्या त्या खेळीनंतर दिग्गज प्लेयर्स आला वठणीवर, रणजी स्पर्धेत उपांत्य फेरीत खेळणार!
बीसीसीआयने नाक दाबताच दिग्गज खेळाडूचं तोंड उघडलं, आता दिग्गज क्रिकेटपटूची रणजी खेळण्याची तयारी
Follow us on

मुंबई : दिग्गज क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धांकडे दुर्लक्ष करत आयपीएलवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर बीसीसीआयने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली होती. खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्त ताकीद दिली होती. पण या ना त्या कारणाने खेळाडू याकडे कानाडोळा करत होते. त्यामुळे बीसीसीआयच्या शब्दांना किंमत आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य क्रीडारसिकांना पडला होता. त्यानंतर बीसीसीआयने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच आडमुठ्या खेळाडूंना इंगा दाखवण्यासोबत निष्ठेने खेळणाऱ्या खेळाडूंना रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयने रेड क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. अशा सर्व घडामोडी घडत असताना खेळाडूंना उपरती होत आहे. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरचं पितळ उघडं पडल्यानंतर आता मुंबईकडून रणजी खेळण्यास सज्ज झाला आहे.

रणजी स्पर्धेत 2 मार्च रोजी मुंबईचा सामना सामना तामिळनाडूशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या बीकेसी मैदानात होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस अय्यरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे फिट असल्याचं कळवलं आहे. तसेच मुंबईसाठी रणजी ट्रॉफीत उपांत्य फेरीत खेळण्यास सज्ज असल्याचं सांगितलं आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे खेळत नसल्याचं आधी श्रेयसने बीसीसीआयला कळवलं होतं. पण एनसीएने दुखापतीबाबत पत्र पाठवताच सर्वकाही उघड झालं.

दुसरीकडे, श्रेयस अय्यर इंग्लंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात टीम इंडियाचा भाग होता. पण चार डावात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. 35,13,27 आणि 29 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे त्याला उर्वरित तीन सामन्यात डावलण्यात आलं. त्यात, कर्णधार रोहित शर्मा याने जिंकण्याची भूक असलेल्या खेळाडूंना संधी देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि सर्वच कामाला लागले.

आता तामिळनाडूकडून वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शनही खेळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला टीम इंडियाने रिलीज केलं आहे. सुदर्शनला पाठदुखीचा त्रास होता. मात्र एनसीएने त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे. उपांत्य फेरीत मध्य प्रदेश विरुद्ध विदर्भ आणि मुंबई विरुद्ध तामिळनाडू सामना होणार आहे.