
शुबमन गिलकडे बीसीसीआय भविष्यातील मोठी गुंतवणूक म्हणून पाहात आहे. रोहित शर्मानंतर त्याच्याकडे वनडे आणि कसोटी संघाची धुरा सोपवली. तसेच टी20 संघाचं उपकर्णधारपदही सोपवलं होतं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघात शुबमन गिल खेळणार हे स्पष्ट दिसत होतं. पण त्याच्या ग्रहांनी काही त्याला साथ दिली नाही असंच म्हणावं लागेल. वारंवार संधी देऊनही शुबमन गिल फेल गेला. त्याला दिल्या जाण्याऱ्या संधींमुळे बीसीसीआय टीकेचं धनी ठरलं होतं. अखेर बीसीसीआयने त्याला टी20 वर्ल्डकप संघातून वगळलं. पण शुबमन गिल पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागला आहे. ख्रिसमसच्या दिवशी शुबमन गिलने चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याने सरावात जोरदार फटकेबाजी करत पुनरामगनासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. त्याच्या फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुबमन गिलने कुठे आणि कशी फलंदाजी केली ते जाणून घ्या.
शुबमन गिल पुन्हा एकदा गेलेला फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी मैदानात घाम गाळत आहे. गुरूवारी मोहालीच्या पीसीए मैदानात त्याने सराव केला. यावेळी त्याने आक्रमक फटकेबाजी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुबमन गिलने फिरकीपटूंना लांब शॉट्स मारले. त्याच्या बॅट स्विंगनंतर पुन्हा एकदा त्याला लय मिळाल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक खेळीची आवश्यकता असते. पण शुबमन गिलमध्ये त्याची उणीव दिसून आली होती. आता त्यात सुधारणा करत असल्याचं दिसून येत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघात बरीच उलथापालथ होणार आहे. शुबमन गिलला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
🚨 Shubman Gill is working hard for VHT and IND vs NZ ODIs series ❤️🔥 pic.twitter.com/TKLWE1zUyQ
— Ahmed Says (@AhmedGT_) December 25, 2025
शुबमन गिलने वनडे आणि कसोटी धावा केल्या आहेत. कारण त्याची खेळण्याची पद्धत सुरुवातीला स्लो आणि सेट झाला की आक्रमक अशी आहे. पण टी20 क्रिकेटमध्ये तशी संधी मिळत नाही. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ दाखवणं आवश्यक असतं. 2025 या वर्षात गिलने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. पण संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने काही पर्यायच नाही. आता शुबमन गिल वनडे क्रिकेटसाठी तयारी करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. विजय हजारे ट्रॉफीत शुबमन गिल पंजाबकडून खेळणार आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल खेळला नव्हता. दुसऱ्या सामन्यात चंदीगडविरुद्ध खेळणंही कठीण आहे. कारण सामन्याच्या एक दिवस आधी मोहालीत सराव करत आहे.