SL vs AUS Live Streaming : श्रीलंकेसमोर घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचं आव्हान, यजमान सलग दुसरा पराभव टाळणार?
Sri Lanka vs Australia Womens World Cup 2025 Live Match Score :श्रीलंका महिला क्रिकेट संघाला विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी शनिवारी कांगारुंना पराभूत करावं लागणार आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे.

आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. एकूण 8 संघांनी प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. या स्पर्धेतील पहिली फेरी पूर्ण झाली आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड या संघांनी स्पर्धेत विजयी सुरुवात केली. तर श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला. आता 4 ऑक्टोबरपासून या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना केव्हा?
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना शनिवारी 4 ऑक्टोबरला होणार आहे.
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना कुठे?
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामन्याला भारतीय वेळेनुसार 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स मॅच मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह कुठे पाहता येईल?
श्रीलंका वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स मॅच मोबाईल-लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
श्रीलंका घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला रोखणार?
श्रीलंका या स्पर्धेत विजयी सलामी देण्यात अपयशी ठरली. यजमान भारताने श्रीलंकेवर स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 30 सप्टेंबरला डीएलएसनुसार 59 धावांनी मात केली. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 89 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेला पराभूत करुन स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान श्रीलंकेसमोर घरच्या मैदानात कांगारुंना पराभूत करुन पहिला विजय मिळवण्याचं आव्हान आहे. अशात कोण जिंकणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
दरम्यान पहिल्या फेरीनंतर इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसर्या स्थानी आहे. विजयी संघात बांगलादेश तिसऱ्या आणि टीम इंडिया चौथ्या स्थानी आहे. तर श्रीलंका पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
