Test Cricket : दुसऱ्या सामन्यासाठी टीम जाहीर, दुखापतीमुळे स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, संघाला मोठा झटका
Test Cricket : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिल्याच मालिकेत टीमला मोठा झटका लागला आहे. वेगवान गोलंदाजाला दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत सध्या एकूण 4 संघ खेळत आहेत. भारतीय क्रिकेट संघ शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. तर श्रीलंका मायदेशात बांगलादेश विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. उभयसंघातील पहिला सामना अनिर्णित राहिला. श्रीलंका क्रिकेट टीम दिग्गज ऑलराउंडर अँजलो मॅथ्युज याला विजयी निरोप देण्यात अपयशी ठरली. त्यानंतर आता दुसरा आणि अंतिम सामना हा 25 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. त्या दुसऱ्या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजाला दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.
मिलन रथनायके ‘आऊट’
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोमवारी 23 जून रोजी दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दुसरा सामना 25 ते 29 जुलै दरम्यान कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मिलन रथनायके याला दुखापतीमुळे खेळता येणार नाही. निवड समितीने मिलनच्या जागी विश्वा फर्नांडो याचा समावेश केला आहे. तसेच फिरकीपटू दुनीथ वेल्लालागे यालाही संधी देण्यात आली आहे. दुनीथला पहिल्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अँजलो मॅथ्युज याच्या जागी घेतलं आहे.
कोण जिंकणार मालिका?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश पहिला सामना हा 17 ते 21 जून दरम्यान खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. बांगलादेशने पहिल्या डावात 495 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेने प्रत्युत्तरात 485 रन्स केल्या. त्यानंतर बांगलादेशने दुसर्या डावात 6 बाज 285 धावांवर डाव घोषित केला. तर बांगलादेशकडे 10 धावांची आघाडी होती. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 37 ओव्हरमध्ये 296 रन्सचं टार्गेट मिळालं. मात्र सामना अनिर्णित राहिला. श्रीलंकेने पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावून 72 रन्स केल्या होत्य. त्यामुळे आता दोन्ही संघांकडे शेवटच्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम जाहीर
The Sri Lanka Cricket Selection Committee has named the below 19-member squad for the second test match.
The second test match will start on the 25th of June, 2025, at the SSC Ground, Colombo.#SLvBAN #WTC27 pic.twitter.com/oJNVNuFBMZ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 23, 2025
बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंका टीम : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), पाथुम निसांका, ओशाद फर्नांडो, लाहिरू उदारा, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, कुसल मेंडिस, दुनिथ वेल्लागे, पसिंदु सोरियाबंदारा, सोनल दिनुशा, पवन रथनायके, प्रभात जयसूर्या, थरिंदु रथनायके, अकिला धनंजय, विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो, कासुन राजिथा आणि इसिथा विजेसुंदरा.
