
श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकेची ठिकठाक सुरुवात झाली. लंकेच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. त्यामुळे श्रीलंका 200 पार जाते की काय? अशी चर्चा रंगली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि लंकेला धक्क्यावर धक्के देत बॅकफुटवर ढकललं. टीम इंडियाने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 31 धावा देत लंकेला 7 धक्के दिले. त्यामुळे लंकेला 161 धावांवर रोखण्यात यश आलं. लंकेकडून कुसल परेरा याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आता टीम इंडिया या विजयी आव्हानाचा यशस्वी पाठलाग करुन सामन्यासह मालिका जिंकणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
श्रीलंकेच्या पहिल्या 6 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. कुसल परेरा याने 34 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 53 रन्स केल्या. पाथुम निसांका याने 32 धावा जोडल्या. कामिंदू मेंडीसने 26 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन चरिथ असलंका आणि कुसल मेंडीस या दोघांनी अनुक्रमे 14-10 धावा केल्या. तर आर मेंडीसने 12 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर महिश तीक्षणा याने 2 रन्स केल्या. तचसेच मथिशा पथीराणा 1 धावेवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई व्यतिरिक्त अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या या त्रिकुटाने 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियासमोर टार्गेट 162
Bowlers shared the spoils as Sri Lanka are restricted to 161/9 👍 👍
India’s chase has begun with #TeamIndia 6/0!
Scorecard ▶️ https://t.co/R4Ug6MQGYW#SLvIND pic.twitter.com/NUC7ppjRcG
— BCCI (@BCCI) July 28, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.