SL vs IND 3rd Odi: कुसल-अविष्काची शानदार खेळी, टीम इंडियासमोर 249 धावांचं आव्हान

Sri Lanka vs India 3rd Odi 1st Innings Highlights: श्रीलंकेसाठी अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडीस या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या.

SL vs IND 3rd Odi: कुसल-अविष्काची शानदार खेळी, टीम इंडियासमोर 249 धावांचं आव्हान
kusal mendis and avishka fernando
| Updated on: Aug 07, 2024 | 6:34 PM

श्रीलंकेने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 249 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 248 धावा केल्या. श्रीलंका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता करो या मरो सामन्यात टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवणार? की श्रीलंका 24 वर्षांनंतर टीम इंडिया विरुद्ध द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात निश्चित होईल.

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेच्या फलंदाजांनी अप्रतिम सुरुवात केली. पाथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो या सलामी जोडीने 89 धावांची भागीदारी केली. त्यानतंर पाथुम 65 बॉलमध्ये 45 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर अविष्का आणि कुसल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावा जोडल्या. त्यानंतर पदार्पणवीर रियान पराग याने अविष्काला नर्व्हस नाईंटीचा शिकार करत वनडे क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. अविष्का 102 बॉलमध्ये 96 धावा करुन आऊट झाला. इथून टीम इंडियाने कमबॅक केलं आणि श्रीलंकेला ठराविक अंतराने ढटके दिले.

चरिथ असलंका याने 10 धावा केल्या. सदीरा समरविक्रमाला भोपळाही फोडता आला नाही. जनिथ लियानगे 8 धावा करुन माघारी परतला. त्यांनतर दुनिथ वेल्लालगे याने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर अखेरीस कुसल मेंडीस याने फटकेबाजी करत श्रीलंकेला 235 पर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर कुसल मेंडीस 59 धावांवर आऊट झाला. त्यानंतर कमिंदु मेंडीस आणि महीश तीक्षणा ही जोडी नाबाद परतली. मेंडीसने नाबाद 23 धावा केल्या. तर तीक्षणाने नॉट आऊट 3 रन्स केल्या. टीम इंडियासाठी रियान पराग याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियासमोर 249 धावांचं आव्हान

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.