SL vs NED Live Streaming: श्रीलंके विरुद्धचा सामना नेदरलँड्ससाठी Super 8 च्या हिशेबाने निर्णायक, कोण जिंकणार?

Sri Lanka vs Netherlands T20 World Cup 2024 Live Match Score: श्रीलंका आणि नेदरलँड यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडणार आहे. या स्पर्धेतून श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी नेदरलँडसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कधी आणि कुठे पाहाल हा सामना जाणून घ्या

SL vs NED Live Streaming: श्रीलंके विरुद्धचा सामना नेदरलँड्ससाठी Super 8 च्या हिशेबाने निर्णायक, कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 11:27 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ड गटातून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या संघासाठी बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये चुरस आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशला संधी अधिक आहे. पण या स्पर्धेतील उलटफेर पाहता काहीही होऊ शकतं. श्रीलंका आणि नेदरलँड यांच्यात महत्त्वाचा सामना 17 जून रोजी पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे. या सामन्यावर नेदरलँडचं भविष्य अवलंबून आहे. कारण नेदरलँडने हा सामना जिंकला आणि नेपाळने बांगलादेशला पराभूत केलं तर नेदरलँडला संधी मिळू शकते. त्यामुळे या सामन्यातवर बरंच काही अवलंबून आहे.

नेदरलँडने यापूर्वी सराव सामन्यात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे काही सांगता येत नाही. दुसरीकडे, नेपाळने दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी चांगलंच झुंजवलं होतं. अवघ्या एका धावेने दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला होता. त्यामुळे बांगलादेशला सहज विजय मिळेल असंही सांगता येत नाही. नेदरलँडने सराव सामन्यात श्रीलंकेला 20 धावांनी पराभूत केलं होतं. नेदरलँडने श्रीलंकेसमोर विजयासाोठी 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची पडझड झाली. 18.5 षटकात सर्व गडी बाद 161 धावा केल्या आणि 20 दावांनी पराभव सहन करावा लागला.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना रविवार 17 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याचं आयोजन हे  सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरु होणार?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याला सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. तर 5.30 वाजता टॉस होईल.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येईल?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना फुकटात मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

टी 20 वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल , विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.

टी 20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम : वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (विकेटकीपर), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुनीथ नुशमान वेललागेरा, दुनीथ नुशमान चॅलेरा, नुशमन चॅलेस, मथीशा पथीराना आणि दिलशान मदुशंका.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.