
देशांतर्गत टी20 स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नवे विक्रम रचले आणि जुने विक्रम मोडले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर एकापेक्षा एक सरस सामन्यांच्या मेजवानी क्रीडा रसिकांना मिळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असाच एक रोमांचक सामना पार पडला. यात दिल्ली आणि तामिळनाडू हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूने 20 षटकात 7 गडी गमवून 198 धावा केल्या आणि विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्लीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पूर्ण केलं. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर नेमकं काय झालं त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
दिल्लीला शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होता. तर तामिळनाडूकडून गुरजपनीत सिंह गोलंदाजी करत होता. स्ट्राीकला हिम्मत सिंह होता. त्याने 3 चेंडूत 5 धावा केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर काय होते यासाठी अनेकांनी श्वास रोखून ठेवला होता. गुरजपनीतने शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि हिम्मतने चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने हवेत मारला. जेव्हा चेंडू हवेत उडाला तेव्हा झेल बाद होतो की षटकार जातो याची उत्सुकता काही क्षणांसाठी वाढली. कारण स्टार खेळाडू शाहरूख तिथे उभा होता. त्याने बरोबर उडी मारली आणि षटकार जाणारा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू हाताला लागला पण झेल काही झाला नाही. दिल्लीला शेवच्या चेंडूवर षटकार मिळाला आणि हा सामना 6 विकेटने जिंकला.
A CRAZY FINISH IN SYED MUSHTAQ ALI TROPHY.
– Shahrukh Khan almost pulled off a blinder, but Himmat Singh’s smash goes for a six when 2 were needed on the last ball.
pic.twitter.com/zyOeaPg6Du— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 28, 2025
या सामन्यात यश ढुलने जबरदस्त खेळी केली. त्याने धावांचा डोंगर पाहता आक्रमक खेळी केली. त्याने 46 चेंडूत 71 धावा केल्या. यात चार चौकार आणि 4 षटकार मारले. प्रियांश आर्यने देखील 15 चेंडूत 35 धावा केल्या. कर्णधार नितीश राणानेही 34 धावा करत विजयात योगदान दिलं. तर आयुष बडोनीने 23 चेंडूत 41 धावा केल्या विजयी धावा गाठण्यास मदत केली.
तामिळनाडू (प्लेइंग इलेव्हन): अमित सात्विक, तुषार रहेजा, साई सुधरसन, एन जगदीसन (विकेटकीपर), शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, आर राजकुमार, सोनू यादव, वरुण चक्रवर्ती (कर्णधार), गुरजपनीत सिंग, टी नटराजन.
दिल्ली (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, यश धुल, आयुष बडोनी, नितीश राणा (कर्णधार), हिम्मत सिंग, अनुज रावत (डब्ल्यू), तेजस्वी दहिया, सुयश शर्मा, इशांत शर्मा, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव.