Smriti Mandhana: पाहताच ती बाला… काळ्या साडीत स्मृती मानधनाचा कहर, देशाला मिळाली नवी क्रश, Video पाहिला?
Smriti Mandhana Black Saree: भारतीय मुलींना क्रिकेटच्या जगतात झेंडे रोवले आहे. सध्या महिला प्रीमियर लीग 2026 सुरू आहे. त्यात विविध संघ दमदार कामगिरी करत आहे. तर RCB ही स्टाईलिश महिला खेळाडूंमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये सर्वात कहर केलाय तो कर्णधार स्मृती मानधना हिने. काळ्या साडीतील तिचा किलर लूक सध्या चर्चेत आला आहे.

Smriti Mandhana Black Saree: महिला प्रिमियम लीगमध्ये विविध संघातील क्रिकेट खेळाडूंची जोरदार चर्चा सुरू आहे. यातील अनेक महिला खेळाडूंनी चौकार,षटकार लगावले आहेत. तर काही गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी डाव पालटला आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. मैदान गाजवणाऱ्या या महिला खेळाडूंनी मैदानाबाहेर पण जलवा दाखवला आहे. या महिला खेळाडूंचा जलवा दिसून आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) संघाच्या एका एका महिला खेळाडूच्या अदांनी चार चाँद लावले आहेत. अनेकांना घायाळ केले आहे. रेड बोल्ड अँड गोल्डन कार्पेट इव्हेंटमध्ये या महिला खेळाडू नटून थटून आल्या. त्यांना पाहताच अनेक जण क्लिन बोल्ड झाले. यामध्ये स्मृती मानधनाच्या काळ्या साडीतील लूकने तर कहर केला. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पाहताच ती बाला कलिजा खल्लास झाला या ओळी अनेकांच्या ओठी आल्या.
महिला खेळाडू की परी
रेड बोल्ड अँड गोल्डन कार्पेट इव्हेंटमध्ये या महिला खेळाडूंचे जलवे काही औरच होते. त्यांच्या या स्टाईल लूकने अनेक जण तिथेच धावबाद झाले. अनेकांच्या तोंडाचा आ वासलेला होता. त्यांच्या सौंदर्यावर अनेक जण भाळले. या महिला खेळाडूंच्या सुपर स्टाईलिश कपड्यांची पण मोठी जादू चालली. अनेक महिला खेळाडू जणू सुंदर अप्सरा आणि परीच भासत होत्या. यामध्ये सर्वात जास्त भाव खाऊन गेली ती कर्णधार स्मृती मानधना.
काळ्या साडीतील स्मृतीचा कहर
स्मृती मानधना ही तिच्या खास स्टाईलसाठी पूर्वीपासून ओळखली जाते. तिचे स्टाईल स्टेटमेंट प्रत्येकाचं मन जिंकून घेते. या इव्हेंटमध्ये ती काळी साडून घालून आली तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेकांचे डोळे विस्फारले. तिच्या सौंदर्याला या काळ्या साडीने जणू चार चाँद लावले.या इव्हेंटमध्ये परदेशी क्रिकेट सौंदर्यवती खेळाडू पण सहभागी झाल्या होत्या. पण खरा भाव स्मृती खाऊन गेली होती.
𝗥𝗲𝗱, 𝗕𝗼𝗹𝗱 𝗮𝗻𝗱 𝗚𝗼𝗹𝗱 𝗖𝗮𝗿𝗽𝗲𝘁 𝗦𝗲𝗰𝗿𝗲𝘁𝘀 😉✨
Who’s got the most fashionable look? Who took the most time to get dressed? Our stars spill the beans on @bigbasket_com presents RCB Bold Diaries. 💃🥳#PlayBold #ನಮ್ಮRCB #WPL2026 pic.twitter.com/QhurcQkVjC
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 23, 2026
स्मृतीने या इव्हेंटसाठी काळ्या रंगाची साडी निवडली होती. त्यात तिचा साधेपणा उठून दिसला. या काळ्या साडीत ती बोल्ड आणि क्लासी दिसत होती. तिच्या एकूणच वागण्यात कमालीचा उत्साह आणि विश्वास झळकत होता. या साडीत ती एकदम सुंदर, रुपवती दिसत होती. एखाद्या परीसारखी ती भासत होती. स्लीवलेस ब्लाऊज,राऊंड नेकलाईन यामुळे तिचे सौंदर्य खुलले होते. कोणताही भपकेबाजपणा न दाखवता ती या इव्हेंटमध्ये उठून दिसली. अनेकांनी तिचे कौतुक केले. तर काहींनी नवीन नॅशनल क्रश आल्याची कमेंट केली.
