लग्नाचा मुहूर्त टळला! स्मृती मंधाना सर्व काही स्थिर स्थावर होत असताना घेणार मोठा निर्णय, आता….

क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या दिवसांपासून उलथापालथी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे घडामोडी घडल्या. असं असताना स्मृती आणि पलाश यांच्यात काय झालं याबाबत वावड्या उठल्या आहे. असं असताना स्मृती मंधानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

लग्नाचा मुहूर्त टळला! स्मृती मंधाना सर्व काही स्थिर स्थावर होत असताना घेणार मोठा निर्णय, आता....
लग्नाचा मुहूर्त टळला! स्मृती मंधानाने सर्व काही स्थिर स्थावर होत असताना घेतला मोठा निर्णय, आता....
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2025 | 4:00 PM

भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीच्या वैयक्तिक आयुष्यात मागच्या महिनाभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे अत्यानंद झाला होता. त्यात प्रियकर पलाश मुच्छलने भर मैदानात सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. लग्नाची तारीख ठरली आणि अंगाला हळदही लागली. मात्र सात फेरे घेणार तितक्यात या प्रेम कहाणीत ट्विस्ट आला. स्मृतीच्या वडिलांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पलाशच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे मुलाने पुढे लग्न ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पलाशला रुग्णालयात दाखल करावं लागलं. स्मृती आणि तिच्या संघ सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर फोटो डिलिट केले. त्यामुळे काही तरी गडबड आहे या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं. पण असं सर्व वैयक्तिक आयुष्यात घडत असताना स्मृती मंधानाने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया डिसेंबरच्या शेवटी श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे.

माहितीनुसार, बांगलादेशविरुद्धची मालिका टाळल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेसोबत मालिका खेळणार आहे. केरळची राजधानी तिरूवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील तिन्ही सामना तिरुवनंतपुरम येथे खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 26 डिसेंबरपासून होणार आहे. दुसरा टी20 सामना 28 डिसेंबरला आणि शेवटचा टी20 सामना 30 डिसेंबरला होणार आहे. या मालिकेत स्मृती मंधाना खेळण्याची शक्यता आहे. कारण सध्या तरी तिच्या लग्नाबाबत काहीच अपडेट नाहीत. लग्न होणार की नाही याबाबतही स्पष्टता नाही.

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न 23 नोव्हेंबरला सांगलीत पार पडणार होतं. पण लग्न त्या दिवशी होऊ शकलं नाही. त्यामुळे टी20 मालिका खेळण्याचा निर्णय स्मृतीने घेतला तर लग्न टळल्यापासून 33 दिवसांनी मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, जेमिमा रॉड्रिग्जच्या वुमन्स बिग बॅग लीगमध्ये न खेळण्याच्या निर्णय घेतला आहे. ब्रिस्बेन हीटने अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं की, भारतीय खेळाडू मंधानाला पाठिंबा देण्यासाठी जेमिमा भारतात राहील. ती लीगचे शेवटचे चार सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतणार नाही.