पलाश मुच्छलबाबत रुग्णालयातून मोठी अपडेट, स्मृती मंधानाचे वडील घरी येताच…
क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि प्रियकर पलाश मुच्छल यांच्या लग्नात विघ्न पडलं. स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत खालावली आणि लग्न थांबवलं गेलं. पण सोशल मीडियावरून लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो डिलिट केल्याने वेगळंच वळण लागलं. आता या घटनेत नवी अपडेट समोर आली आहे.

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांच्या लग्नात एक ट्विस्ट आला आणि लग्न काही मिनिटांआधी थांबलं. स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत खालावली आणि लग्न थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधान यांना हृदयविकाराची लक्षण जाणवल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पलाशने हे लग्न थांबवल्याचं त्याच्या आईने सांगितलं. कारण स्मृतीच्या वडिलांसोबत पलाशचे घट्ट संबंध होते. त्याने भावनिक होत वडिलांची तब्येत जिथपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं पलाशच्या आईने सांगितलं. दुसरीकडे, स्मृतीच्या वडिलानंतर पलाशलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, छातीत दुखणं आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून पलाशला रुग्णालयात दाखल केलं होतं.
पलाश मुच्छलवर सुरुवातीला सांगलीत उपचार करण्यात आले. त्यानंतर मुंबईत हलवण्यात आले होते. पण तीन दिवसांच्या कालावधीत बऱ्याच बातम्या येत असताना पलाशच्या आईची तेवढी प्रतिक्रिया समोर आली. आता स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सांगलीतील रुग्णालय व्यवस्थापनाने इंडिया टीव्हीला सांगितले की, श्रीनिवास यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि धोक्याबाहेर आहे. डॉक्टरांनी त्याच्या मूल्यांकनाचा भाग म्हणून अँजिओग्राफी केली आणि त्यात कोणतेही ब्लॉकेज आढळले नाहीत. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आल्यानंतर पलाश मुच्छल यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून आहे.
स्मृतीचे वडील श्रीनिवास आणि प्रियकर पलाश मुच्छल यांना डिस्चार्ज मिळाल्याने लग्नाच्या तारखेबाबत काय होतं याकडे लक्ष लागून आहे. पण या चार दिवसांच्या कालावधीत बऱ्याच वावड्या उठल्या आहेत. वेगवेगळ्या थेअरी मांडल्या गेल्या आहेत. पण याबाबत सत्य काय ते अजून पटलावर आलं नाही. आता स्मृतीच्या कुटुंबियांकडून अधिकृतरित्या नेमकं काय घडलं हे कळत नाही तोपर्यंत सोशल मीडियावर चर्चा आणि अफवांचं पेव असेल हे मात्र नक्की…
