
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुहूर्त काढला तो 23 नोव्हेंबरचा.. वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्याने या लग्नाचं महत्त्वा वाढलं होतं. कारण संघातील सर्वच सहकारी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. संगीत कार्यक्रम, हळदी आणि क्रिकेट सामनाही पार पडला. लग्नासाठी मुंडावल्या बांधल्या गेल्या. सात फेरे घेण्यासाठी या लग्नाला नजर लागली असंच म्हणावं लागलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि मांडवात धावाधाव झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्या वेळाने पलाशची स्थितीही बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता सर्व काही सुरळीत होताना दिसत आहे. दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच लग्न कधी होणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण या दरम्यान घडणाऱ्या घडामोडींमुळे संशयाला वाव आहे.
स्मृती मंधानाची मैत्रिण आणि संघ सहकारी राधा यादवने पलाशला अनफॉलो केलं. स्मृती आणि इतरांनी लग्न सोहळ्याचे सर्व फोटो डिलिट केले. जेमिमाने आपल्या मैत्रिणीसाठी बिग बॅश लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. पलाशला डिस्चार्ज मिळाल्यानंतरही दोघांची भेट नाही. पलाश थेट प्रेमानंद महाराजांच्या दरबारात गेला. त्यानंतर 13 दिवासांनी स्मृतीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच ना… आता या व्हिडीओतून एक बाब नेटकरी आणि तिच्या चाहत्यांच्या लक्षात आली आहे. स्मृतीने टूथपेस्ट ब्रँडसाठी एक प्रमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात स्मृती मंधानाच्या बोटातून साखरपुड्याची रिंग नसल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे.
नेटकऱ्यांच्या मते हा व्हिडीओ कदाचित साखरपुड्याच्या आधी शूट केला असावा. त्यामुळे तिच्या बोटात अंगठी दिसत नाही. पण सोशल मीडियावर दोन्ही बाजूने चर्चा रंगल्या आहे. पण यावर स्मृती मंधानाने मौन बाळगलं आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी झालं असावं असा संशय चाहत्यांच्या मनात आहे. नाही तर स्मृती पलाशला भेटायला नक्कीच गेली असती. त्याच्या तब्येतीची चौकशी केली असती. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे काय झालं हे आता फक्त स्मृती आणि पलाशच सांगू शकतात.