वहिनीशी बोलणंही थांबलं…! हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद?

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोन्ही भावंडांबाबत सोशल मीडियावर बिनसल्याच चर्चा रंगली आहे. काही घडामोडी अशा घडल्या की संशयाला वाव आहे. चला जाणून घेऊयात दोघांबाबत सोशल मीडियावर काय चर्चा आहेत.

वहिनीशी बोलणंही थांबलं...! हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद?
वहिनीशी बोलणंही थांबलं...! हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद?
Image Credit source: TV9 Network File Photo
| Updated on: Mar 11, 2026 | 10:31 PM

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी एकत्र क्रिकेटचे धडे गिरवले. एकाच संघात दोघांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं. इतकंच काय तर या दोघांनी आयपीएलमध्ये एकत्र सामनेही खेळले. त्यामुळे या दोघांचx एकमेकांशी जबरदस्त जमतं असंच चित्र होतं. पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्या आणि त्याच्या वहिनीशी बोलणंही बंद झालं आहे. हार्दिक पांड्याची माहिका शर्मासोबत जवळीक वाढल्यानंतर या वादाला फोडणी मिळाली की काय? अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहिल्या तर तसंच म्हणावं लागेल. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरीही जबरदस्त राहिली. पण कृणाला पांड्याने ना त्याचं अभिनंदन केलं ना हा सामना पाहण्यासाठी मैदानात गेला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद असल्याचं बोललं जात आहे.

हार्दिक आणि कृणाल पांड्या कायम छोटेमोठे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर एकमेकांसोबत शेअर करायचे. मात्र यावेळी तसं काही दिसलं नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा विजयी प्रवास सुरू असताना कृणाल पांड्या मैदानाच्या आसपासही फिरकला नाही. इतकंच काय तर कृणाल पांड्याची पत्नी पखुंडी देखील मैदानात सामना पाहण्यासाठी आली नाही. या उलट माहिका शर्मा हार्दिक पांड्याचे प्रत्येक सामने पाहण्यासाठी उपस्थित होती. जेतेपद मिळवल्यानंतर हार्दिक पांड्याने माहिकाचा पत्नी म्हणून उल्लेख केला. इतकंच काय तर मैदानात बिंधास्तपणे तिच्यासोबत गळ्यात गळे घालून फिरत होता.

हार्दिक पांड्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं टाळलं!

हार्दिक पांड्याने या वर्षी वहिनीच्या बर्थडेला शुभेच्छा दिल्या नाही. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. पण या निव्वळ चर्चा आहे. सोशल मीडियावरील चर्चांना तसा काही अर्थ नसतो. पण नताशा स्टेनकोविकपासून विभक्त झाल्यापासून कुटुंबात वादाची ठिणगी पडली असावी असं बोललं जात आहे. हार्दिकचा घटस्फोट झाल्यानंतरही कृणाल आणि त्याच पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यसोबत दिसले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us