Sourav Ganguly: हॉस्पिटलने दिली बीसीसीआय अध्यक्षांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

| Updated on: Dec 29, 2021 | 4:56 PM

गांगुलीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेत, तरी त्याला कोरोनाची लागण झाली. सोमवारी रात्री उशिरा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sourav Ganguly: हॉस्पिटलने दिली बीसीसीआय अध्यक्षांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सौरव गांगुली
Follow us on

कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या प्रकृतीबाबत कोलकात्तामधील वुडलँड हॉस्पिटलने पत्रक जारी करुन माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे सोमवारी संध्याकाळी सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. (Sourav Ganguly COVID Update BCCI President Stable Says Hospital)

सौरव गांगुलीच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी 99 टक्के होती. रात्री त्यांना शांत झोप लागली. सकाळी त्यांनी ब्रेकफास्ट आणि लंच व्यवस्थित केला, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. डॉ. सरोज मोंडल, डॉ. सप्तर्शी बसू आणि डॉ. सौतिक पांडा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वुडलँडस हॉस्पिटलच्या एमडी आणि सीईओ डॉ. रुपाली बासू यांची त्या पत्रकावर स्वाक्षरी आहे.

गांगुलीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेत, तरी त्याला कोरोनाची लागण झाली. सोमवारी रात्री उशिरा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालीय का? त्याच्या तपासणीसाठी गांगुलीचे नमुने घेण्यात आले आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला गांगुलीला दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कार्डिअक म्हणजे ह्दयविकाराच्या आजारामुळे गांगुलीची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीलाही कोरोनाची लागण झाली होती.

संबंधित बातम्या: 

IND vs SA : मोहम्मद शमीचं विकेट्सचं द्विशतक, अश्विन-कपिल देवसह दिग्गज गोलंदाजांना पछाडलं
IND vs SA: हेड कोच राहुल द्रविड यांना ‘घंटा’ वाजवण्याचा मान
IND vs SA: ‘थर्ड अंपायर झोपलाय का?’ शार्दुल ठाकूर No-Ball वर आऊट का?

(Sourav Ganguly COVID Update BCCI President Stable Says Hospital)