सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष; त्यांनी विराटच्या कर्णधार पदावर भाष्य करणे अयोग्य, ते काम निवड समितीचे – वेंगसरकर

| Updated on: Dec 23, 2021 | 1:48 PM

विराट कोहलीच्या कर्णधार पदावर निवड समितीच्या वतीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोलायला  नको होते. त्यामुळे वाद निर्माण झाला असे मत माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे.

सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष; त्यांनी विराटच्या कर्णधार पदावर भाष्य करणे अयोग्य, ते काम निवड समितीचे - वेंगसरकर
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. यावरून भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीच्या कर्णधार पदावर निवड समितीच्या वतीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोलायला  नको होते, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. गांगुली बोलल्यामुळे वाद निर्माण झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

नेमका काय आहे वाद?

दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्याने अनेक गौप्यस्फोट केले होते. ‘बीसीसीआय’कडून कुणीही मला टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले नव्हते,  कर्णधारपद सोड्याचा निर्णय माझा होता, मी तो जाहीर केला असे विराट कोहली पत्रकार परिषदेमध्ये म्हटला होता. मात्र त्यापूर्वी  कोहलीशी कर्णधारपदाबाबत चर्चा झाल्याचे सैरव गांगुली यांनी म्हटले होते. या दोन वेगवेगळ्या वक्तव्यावरून बीसीसीआयमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. यावरून दिलीप वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले वेंगसरकर ?

यावर बोलताना माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे की,  ‘‘गांगुली हा ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष आहे. संघ किंवा कर्णधारपदाची निवड हे विषय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या अखत्यारित येतात. शर्मा यांनी यासंदर्भात मत मांडायला हवे होते,’’  सौरव गांगुली यांनी विराटच्या कर्णधार पदावर भाष्य केल्याने निर्थक वाद निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या 

PKL8 Bengaluru Bulls VS U Mumba : मुंबईचे धुरंधर बंगळुरुवर भारी, पहिल्याच सामन्यात 16 गुणांनी विजय

ICC Test Ranking: जो रुटने अव्वल स्थान गमावलं, विराट कोहलीचं नुकसान, जाणून घ्या कोण आहे नंबर 1

India south Africa tour: विराट कोहली गायब, पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाची BBQ पार्टी