T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!

| Updated on: Oct 26, 2021 | 5:10 PM

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून यंदाची स्पर्धा अनेक वादांमध्ये रंगत असल्याचंच दिसून येत आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्वींटन डिकॉकनेही अजब कारणामुळे सामन्यातून नाव मागे घेतलं आहे.

T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
क्वींटन डिकॉक
Follow us on

दुबई : टी-20 वर्ल्ड विश्वचषकात (T20 World Cup) दररोज काहीतरी नवीन वाद समोर येत आहे. श्रीलंका-बांग्लादेश सामन्यात खेळाडूंमध्ये बाचाबाची, भारत-पाक सामन्यानंतर शमीवर टीका आणि आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा (West Indies vs South Africa) स्टार खेळाडू क्विंटन डिकॉकची (Quinton De Kock) अचानक माघार. या सर्वामुळे स्पर्धेत रोज नवा तणाव पाहायला मिळत आहे. दरम्यान डिकॉकच्या माघार घेण्यामागील कारण नेमकं माहित नसलं तरी जी शक्यता आहे त्यानुसार हे कारण सर्वांनाच थक्क करुन सोडणारं आहे.

सामना सुरु होण्यापूर्वी अखेरच्या क्षणी डिकॉकने वैयक्तिक कारण देत माघार घेतली. यंदाच्या विश्वचषकात सर्व संघ ब्लॅक लाईव्हस मॅटर(Black Lives Matter) अर्थात कृष्णवर्णीय लोकांना पाठिंबा या मोहिमेतंर्गत सामन्याआधी गुडघ्यावर बसताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही खेळाडूंना असे आदेश दिले होते. त्यानंतरच डिकॉकने सामन्यातून माघार घेतली. याआधीही दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सामन्यावेळी डिकॉक हा एकमेव खेळाडू होता. ज्याने या मोहिमेला पाठिंबा दिला नव्हता.

दक्षिण आफ्रिका संघाला तोटा होणार?

डिकॉकच्या या निर्णयामुळे सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला तोटा होऊ शकतो. कारण वेस्ट इंडिज संघाविरुद्ध डिकॉकचा फॉर्म जबरदस्त असतो.  डिकॉकने वेस्ट इंडिजविरुद्ध 50.33 च्या सरासरीने आणि 133.63 च्या स्ट्राईक रेटने 302 रन केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये क्विंटन डिकॉक वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक रन करणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. त्यातच या निर्णय़ानंतर डिकॉक संपूर्ण स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकत असल्याने संघाच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

इतर बातम्या

मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

(South africas quinton de kock took back his name from squad due to Black Lives Matter campaign)