टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडला मदत? आर अश्विनच्या त्या व्हिडीओवरून क्रीडाप्रेमींचा संताप Video

India Vs New Zealand Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांचं पारडं जड आहे. पण आकडेवारीत न्यूझीलंडचा संघ उजवा ठरत आहे. असं असताना आर अश्विनच्या एका व्हिडीओन भारतीय क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडला मदत? आर अश्विनच्या त्या व्हिडीओवरून क्रीडाप्रेमींचा संताप Video
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडला मदत? आर अश्विनच्या त्या व्हिडीओवरून क्रीडाप्रेमींचा संताप Video
Image Credit source: Viral Video/ PTI
| Updated on: Mar 08, 2026 | 6:08 PM

Ravichandran Ashwin video India Vs New Zealand Final: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा विजेता आता काही तासातच कळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. असं असताना आर अश्विनचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसंच आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी केलेला हा व्हिडीओ न्यूझीलंडच्या फायद्याचा आहे. त्यामुळे संताप होणं सहाजिकच आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आर अश्विनने शिवम दुबेला कसं रोखता येईल याबाबत आयडिया दिली आहे. शिवम दुबेचं वादळ कसं रोखायचं आणि आऊट करायचं याबाबत त्याने आपल्या व्हिडीओत विश्लेषण केलं आहे. शिवम दुबेने मधल्या फळीत भारताची बाजू सावरली आहे. या स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे त्याचं आव्हान प्रतिस्पर्धी संघांसमोर आहे. शिवम दुबेने गोलंदाजीत पाच विकेट घेतल्या आहेत.

आर अश्विनने व्हिडीओत विश्लेषण केलं की, शिवम दुबेला लेग साईडच्या बाहेर किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकाला. चेंडू त्याच्यापासून दूर ठेवावा असा सल्ला त्याने दिला आहे. त्याला चेंडू कट करण्यास प्रवृत्त करावं. कारण त्याच्या पुढ्यात चेंडू टाकला तर आरपार मारण्याची ताकद ठेवतो. आर अश्विनने हा व्हिडीओ इंग्रजीत केला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना राग अनावर झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून न्यूझीलंडला मदत होईल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आर अश्विन टीकेचा धनी ठरला आहे.

आर अश्विनने फिनिशर म्हणून 34.83 च्या सरासरीने 209 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 160 च्या आसपास आहे. त्याने एक अर्धशतकही ठोकलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर शिवम दुबेचं आव्हान असणार आहे. अशा स्थितीत त्याला बाद करण्याचा फॉर्म्युला आर अश्विनने न्यूझीलंडला दिल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आयसीसी स्पर्धेत सहावेळा आमनेसामने आले आहेत. दोन वेळा भारताने, तर दोन वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

Follow Us