AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs PBKS : हैदराबादकडे पंजाबचा हिशोब करण्याची संधी, ऑरेंज आर्मी पलटवार करणार?

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Preview : पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी पंजाबने हैदराबादवर विजय मिळवला होता. आता हैदराबादकडे परतफेड करण्याची संधी आहे.

SRH vs PBKS : हैदराबादकडे पंजाबचा हिशोब करण्याची संधी, ऑरेंज आर्मी पलटवार करणार?
PBKS vs SRHImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 06, 2026 | 9:13 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात बुधवारी 6 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघातील हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हैदराबादचा हा या मोसमातील 11 वा आणि पंजाबचा दहावा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 6-6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ आणखी एक विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने पुढचं पाऊल टाकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच हैदराबादकडे या सामन्यात एक हिशोब करण्याची संधी आहे. हैदराबादला हा सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. हैदराबादसोबत गेल्या सामन्यात काय झालं होतं? हे आपण जाणून घेऊयात.

हैदराबाद पलटवार करणार?

पंजाब विरुद्ध हैदराबाद यांच्यात 11 एप्रिलला न्यू चंडीगडमध्ये सामना खेळवण्यात आला होता. हैदराबाद टीम या सामन्यात 219 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरली होती. पंजाबने 220 धावांचं आव्हान हे सुरक्षित आणि एकतर्फी फरकाने पूर्ण केलं. पंजाबने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 223 धावा केल्या होत्या. आता हैदराबाद या पराभवाची वसूली करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती

ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. पंजाबने या मोसमात 9 सामने खेळले आहेत. पंजाबने 6 सामने जिंकले आहेत. तर 2 वेळा पंजाबचा पराभव झाला आहे. पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पंजाबला 1 गुण देण्यात आला. पंजाबच्या खात्यात एकूण 13 गुण आहेत. पंजाबचा नेट रनरेट हा +0.855 असा आहे.

तर सनरायजर्स हैदराबादने 10 पैकी 6 सामने जिंकलेत. हैदराबादला 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. हैदराबादच्या खात्यात 12 गुण आहेत. तर हैदराबादचा नेट रनरेट हा +0.644 असा आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड

दरम्यान हैदराबाद पंजाबवर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत एकूण 25 सामने खेळवण्यात आले आहेत. हैदराबादने या 25 पैकी सर्वाधिक 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादला 8 सामनेच जिंकता आले आहेत. आता हैदराबाद पंजाबवर मात करुन गेल्या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं