AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs PBKS Live Streaming : हैदराबाद विरुद्ध पंजाब कडवी झुंज, कोण मिळवणार सातवा विजय?

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : प्लेऑफच्या हिशोबाने सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे 2 गुणांसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

SRH vs PBKS Live Streaming : हैदराबाद विरुद्ध पंजाब कडवी झुंज, कोण मिळवणार सातवा विजय?
SRH vs PBKS Live Streaming IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 06, 2026 | 7:37 AM
Share

क्रिकेट चाहत्यांना बुधवारी 6 मे रोजी हायव्होल्टेज सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 49 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. सनरायजर्स हैदराबादचा हा 11 वा आणि पंजाब किंग्सचा 10 वा सामना असणार आहे. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांकडे हा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याच चढाओढ पहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना बुधवारी 6 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद इथे होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

आयपीएलच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान 9 आणि जास्तीत जास्त 10 सामने खेळले आहेत. आता साखळी फेरीतील शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे प्लेऑफच्या हिशोबाने प्रत्येक सामना हा अटीतटीचा होणार आहे. इथून 1 पराभव हा संघाला प्लेऑफपासून दूर ठेवण्यात कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल आणि ओव्हरमध्ये क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळणार यात काडीमात्र शंका नाही.

पंजाबने या मोसमात सुरुवातीपासून सरस कामगिरी केलीय. तर सनरायजर्स हैदराबाद सुरुवातीला सातत्य राखण्यात अपयशी ठरली. मात्र त्यानंतर हैदराबादच्या ऑरेंज आर्मीने कमबॅक केलं. पंजाबने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकलेत. तर हैदराबादने 10 सामन्यानंतर विजयी षटकार लगावला आहे. त्यामुळे आता 6 मे रोजी उभयसंघापैकी कोण सातवा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल