टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 19 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेचा दुसरा विक्रमी विजय, नोंदवले इतके सारे रेकॉर्ड

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंकेने ओमानला 105 धावांनी पराभूत केलं. या विजयासह श्रीलंकेने ब गटत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर ओमानचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यात काय झालं ते...

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 19 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेचा दुसरा विक्रमी विजय, नोंदवले इतके सारे रेकॉर्ड
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 19 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेचा दुसरा विक्रमी विजय, नोंदवले इतके सारे रेकॉर्ड
Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Feb 12, 2026 | 4:51 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 16व्या सामन्यात श्रीलंका आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ओमानच्या बाजूने लागला. पण सामन्यावर पूर्णपणे श्रीलंकेची पकड राहिली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 225 धावा केल्या. तसेच विजयासाठी 226 धावांचं आव्हा दिलं. हे आव्हान गाठताना ओमानचा संघ 9 गडी गमवून 120 धावांपर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेने हा सामना 105 धावांनी जिंकला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतचा हा सर्वात दुसरा मोठा विजय ठरला आहे. इतक्या मोठ्या फरकाने आतापर्यंत कोणत्याही संघाने विजय मिळवलेला नाही. या सामन्यात श्रीलंकेकडून तीन फलंदाजांनी अर्धशतक ठोकलं आहे. कुसल मेंडिसने 61, पवन रत्नायकेने 60 आणि दासुन शनाकाने 50 धावा केल्या. यासह या सामन्यात काही विक्रम नोंदवले गेले. चला जाणून घेऊयात त्याबाबत.

श्रीलंकेने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 100हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी 2007 मध्ये केनिया संघाला 172 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर आता 19 वर्षांनी पुन्हा एकदा 100हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे, भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कधीच 100हून अधिक धावांनी विजय मिळवलेला नाही.

ओमानचा आतापर्यंतच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानने आशिया कप 2025 स्पर्धेत ओमानला 93 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे ओमन संघावर पुन्हा एकदा मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद नदीमने सर्वाधिक चेंडू खेळत 50 धावा केल्या आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवानसह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे. रिझवानने 2024 मध्ये 52 चेंडूत, मोहम्मद नदीमने श्रीलंकेविरुद्ध 52 चेंडूत अर्धोसतक ठोकलं ाहे.

ओमानकडून मोहम्मद नदीमने अर्धशतकी खेळी केली. त्याची ओमानकडून तिसरी सर्वात धीमी अर्धशतकी खेळी ठऱली आहे. यापूर्वी जितेंदर सिंगने 2021 मध्ये पीएनजीविरुद्ध नाबाद 73, प्रतिक आठवलेने 2024 मध्ये 54 आणि अकिब लियासने 2021 मध्ये पीएनजीविरुद्ध नाबाद 50 धावा केल्या होत्या.

ओमानच्या नदीमने आणखी एक विक्रम मोडला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक वय असलेला आणि अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 43 वर्षे आणि 161 दिवस असताना अर्धशतक ठोकलं. हा विक्रम यापूर्वी जयसूर्याच्या नावावर होता. त्याने 2009 मध्ये 39 वर्षे आमि 345 दिवसांचा असताना अर्धशतक ठोकलं होतं.