इंग्लंड कसोटी संघात उलथापालथ, कर्णधार आणि हेड कोच दोन्ही बदलले; कारण…

इंग्लंड कसोटी संघात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर संघात बदल होणार हे निश्चित होतं. कारण बेन स्टोक्सने निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधारपद मोकळं झालं होतं. तर हेड कोचही बदलण्यात आला आहे.

इंग्लंड कसोटी संघात उलथापालथ, कर्णधार आणि हेड कोच दोन्ही बदलले; कारण...
इंग्लंड कसोटी संघात उलथापालथ, कर्णधार आणि हेड कोच दोन्ही बदलले; कारण...
Image Credit source: England Cricket Twitter
| Updated on: Jul 30, 2026 | 5:28 PM

इंग्लंड कसोटी संघात मोठे उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर बदल अपेक्षित होता. पण इंग्लंड संघाने नव्या कर्णधारासह हेड कोचची घोषणाही केली आहे. जो रूटच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी जो रूटने संघाची धुरा सांभाळली आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने 27 कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंडला अनुभवी कर्णधार मिळाला आहे. दुसरीकडे, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टीफन फ्लेमिंगची हेड कोच म्हणून नियुक्ती केली आहे. त्याने ब्रँडन मॅक्कलमची जागा घेतली आहे. फ्लेमिंगने न्यूझीलंडसाठी 111 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्ससाठी 18 वर्षे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्याच्याकडे तगडा अनुभव असून इंग्लंडच्या कामी येणार आहे.

कसोटी संघाचं प्रशिक्षकपद घेताच फ्लेमिंग म्हणाला की…

स्टीफन फ्लेमिंगने हेड कोच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मन मोकळं केलं. मुख्य प्रशिक्षक म्हणून जो रूटसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, ‘इंग्लंड संघात सामील झाल्याचा मला खूप आनंद आहे. जागतिक क्रिकेटमधील हे सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षक पदांपैकी एक आहे आणि ही भूमिका स्वीकारल्याचा मला अभिमान आहे.” मी खेळाडूंसोबत काम करण्यास आणि मॅककुलम व स्टोक्स यांनी केलेल्या कामगिरीवर आधारित पुढील वाटचाल करण्यास उत्सुक आहे. आमचे ध्येय जिंकणे आहे, त्याचबरोबर संघाचे भविष्य घडवणे हे सुनिश्चित करणे तितकेच महत्त्वाचे आहे.’

जो रूट काय म्हणाला?

जो रूटकडे चार वर्षानंतर कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा आली आहे. इंग्लंडचं 65 कसोटी सामन्यात नेतृत्व केलं होतं. त्यात 27 सामन्यात विजय मिळवला आहे. रूटने 2017 ते 2022 या कालावधीत इंग्लंड संघाचं नेतृत्व केलं आहे. पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जो रूट म्हणाला की, ‘इंग्लंडचा कसोटी कर्णधार होण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आणि सौभाग्य आहे. कसोटी कर्णधारपद हे एक कठीण पण अद्भुत काम आहे आणि मी त्यासाठी तयार आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us