स्टार क्रिकेटपटू आणि मॉडेल तानिया सिंग आत्महत्या प्रकरणाची पोलिसांकडून धक्कादायक माहिती

IPL 2024 सुरू होण्याआधी धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक मॉडलच्या आत्महत्या प्रकरणात स्टार खेळाडूचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

स्टार क्रिकेटपटू आणि मॉडेल तानिया सिंग आत्महत्या प्रकरणाची पोलिसांकडून धक्कादायक माहिती
| Updated on: Feb 24, 2024 | 4:50 PM

मुंबई : यंदाच्या आयपीएल 2024 मोसमाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या 22 मार्चला आयपीएलला सुरूवात होणार आहे. मात्र त्याआधी स्टार खेळाडू एका मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणात अडकला आहे. गुजरातमधील सुरत येथे मॉडेल तानिया सिंग हिने रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जो या प्रकरणामुळे आयपीएल आधीच चर्चेत आला आहे.

कोण आहे हा खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युवा फलंदाज अभिषेक शर्मा आहे. आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद या संघाकडून तो खेळतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्याच्या दिवशी तानिया हिचं अभिषेकसोबत बोलणं झालेलं नव्हतं. इतकंच नाहीतर गेल्या वर्षेभरापासून दोघे एकमेकांसोबत बोलले नाहीत. अभिषेक याने सहा महिन्यांपासून व्हॉट्सअॅपरही काही रिप्लाय दिला नाही.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

अभिषेक आपल्यासोबत बोलत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आल्याचं एका मित्राला म्हटलं होतं. आत्महत्या करण्याच्या दिवशी तिने भावाला व्हिडीओ कॉल केला होता. तर आत्महत्येच्या एक दिवस आधी कॅनडामधील एका मैत्रिणीला फोन केला होता. त्यावेळी तेव्हा तिने तिला सांगितंल होतं की, अभिषेकसोबत बोलणं होत नाहीये, तो मेसेजलाही काही रिप्लाय देत नाहीये. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये आहे.

अभिषेक आणि तानियाचे कॉल डिटेल्स

अभिषेक आणि तानिया सिंहमधील कॉल डिटेल्समधून समोर आलं आहे की अभिषेक तानियासोबत बोलत नव्हता. गेल्या सहा महिन्यांमध्ये तानियाने केलेल्या मेसेजलाही उत्तर दिलं नाही. अभिषेक शर्माला तानियाने मेसेजमध्ये, प्लीज, मला व्हॉट्सॲपवर ब्लॉक करू नको’, म्हटलं होतं. त्यानेही तिला ब्लॉक केल्याचं कुठे दिसलं नाही. आता पोलिसांसमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामधील एक म्हणजे दोघांमध्ये आधी चांगली मैत्री होती मग असं काय घडलं की अभिषेक याने बोलणं बदं केलं. इतकंच नाहीतर त्याने तानिया हिचे फोनही उचलणं बंद केलं. मात्र तानियाच्या घरच्यांनी ती डिप्रेशनमध्ये नव्हती असं म्हटलं आहे.

आत्महत्येच्या दिवशी काय घडलं?

तानिया सिंग रविवारी रात्री उशिरा घरी परतली होती. सकाळी जेव्हा तिच्या वडिलांनी (भंवर सिंग) तिला उठवायला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की तानियाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करत याबद्दल माहिती दिली. आता पोलीस तानिया हिच्या फोनमधील फोटो, कॉल डिटेल्स पाहून या प्रकरणाचा तपास करत आहेत.