
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन युएईत करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ 14 सप्टेंबरला लढणार आहे. असं सर्व आशिया कप स्पर्धेबाबत चर्चा सुरु असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव फिट आहे का? सूर्यकुमार यादव आहे कुठे? फिटनेसमुळेच त्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे. सध्या एनसीएमध्ये रिहॅब करत आहे. त्याने फलंदाजीचा सरावही सुरु केला आहे. पण त्याच्या फिटनेसबाबत अजूनही काहीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. सूर्यकुमार यादव टी20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. तसेच फलंदाजीमुळ टीम इंडियाची ताकद वाढते. त्यामुळे सूर्यकुमार यादवने खेळावं अशीच क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला फिट असल्याचा दाखला मिळणं आवश्यक आहे. अन्यथा दुसरा पर्याय शोधणं भाग आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, शुबमन गिलला आशिया कप टी20 संघात सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर सूर्यकुमार यादव फिटनेसच्या कारणास्तव या स्पर्धेत खेळला नाही, तर मात्र शुबमन गिलकडे सूत्र सोपवली जातील. कारण त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात शुबमन गिलकडे नेतृत्व होतं. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला जाईल. सूर्यकुमारच्या गैरहजेरीत शुबमन गिलला नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.
शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं नाही तर मग दुसरा पर्याय हा श्रेयस अय्यरचा असेल. त्याला आशिया कप स्पर्धेत संघात स्थान दिलं जाईल. सूर्यकुमार यादवला खेळला नाही तर मग श्रेयस अय्यरच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्याच्यामुळे चौथ्या क्रमांकाची चिंता दूर होईल. दरम्यान, सूर्यकुमार यादवला आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे अक्षर पटेलचा.. अक्षर पटेल हा टी20 संघातील महत्त्वाचा भाग आहे. त्याला फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.