सूर्यकुमार यादवला संघातून डावललं, तर शिवम दुबेला मिळाली संधी! झालं असं की…

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेने चमकदार कामगिरी केली. त्याच्या खेळीमुळे संघाचा विजय सोपा झाला.आता शिवम दुबे मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला बाहेर केलं आहे.

सूर्यकुमार यादवला संघातून डावललं, तर शिवम दुबेला मिळाली संधी! झालं असं की...
सूर्यकुमार यादवला संघातून डावललं, तर शिवम दुबेला मिळाली संधी! झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 07, 2025 | 4:50 PM

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची ही लिटमस टेस्ट असणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. असं असताना कर्णधार सूर्यकुमार यादव महाराष्ट्रविरुद्धच्या सराव सामन्यातून डावललं असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई संघातून का डावललं ते मात्र अजून स्पष्ट नाही. सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे. त्याने एकही अर्धशतक ठोकलं नाही. त्यामुळे या सामन्यात खेळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर शिवम दुबे या सामन्यात खेळताना दिसणार आहे. शिवम दुबे सध्या फॉर्मात आहे. आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली. तिलक वर्मासोबत केलेल्या भागीदारीमुळे विजय मिळवणं सोपं झालं. आता महाराष्ट्रविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळताना दिसणार आहे.

रणजी ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील सामना महत्त्वाचा मानला जात आहे. हा सामना एमसीए मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईकडून अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, मुशीर खान या सारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहे. दुसरीकडे, पृथ्वी शॉ आता मुंबई ऐवजी महाराष्ट्रकडून खेळताना दिसणार आहे. आता त्याच्या समोर मुंबईचा संघ असणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही लक्ष लागून आहे. महाराष्ट्र संघातून ऋतुराज गायकवाड, अंकित बावने आणि जलज सक्सेना सारखे खेळाडू मैदानात उतरतील.

मुंबईचा संघ: शार्दुल ठाकुर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सुवेद पारकर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तमोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशु सिंह, तुषार देशपांडे, इरफान उमैर, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डियास.

महाराष्ट्राचा संघ : पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, ऋतुराज गायकवाड़, अंकित बावने (कर्णधार), सौरभ नवाले (विकेटकीपर), जलज सक्सेना, विक्की ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप ढाडे, हितेश वालुंज, मंदार भंडारी (विकेटकीपर), हर्षल केट, सिद्धार्थ म्हात्रे, राजवर्धन हंगरगेकर, रजनीश गुरबानी.