AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Syed Mushtaq Ali Trophy | सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेचा थरार रंगणार, एकूण 38 संघ आमनेसामने भिडणार

या स्पर्धेत एकूण 38 संघ आमनेसामने भिडणार आहेत.

Syed Mushtaq Ali Trophy | सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेचा थरार रंगणार, एकूण 38 संघ आमनेसामने भिडणार
सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धा
| Updated on: Jan 10, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेला (Syed Mushtaq Ali T20 Trophy) आजपासून (10 जानेवारी) सुरुवात होत आहे. या स्पर्धेनिमित्त अनेक युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धा म्हणजे आयपीएलची रंगीत तालीम, असं म्हटलं तर वावग ठरायला नको. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी आपली दावेदारी सिद्ध करण्याची संधी असणार आहे. तसेच या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यात येणार आहे. यामुळे ही सय्यद मुश्ताक अली स्पर्धा युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असणार आहे. (Syed Mushtaq Ali t 20 Trophy start 10 january 2021)

10 ते 31 जानेवारी अशा एकूण 22 दिवस हा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 169 सामने खेळले जाणार आहेत. 19 जानेवारीपर्यंत या स्पर्धेतील साखळी सामने खेळले जाणार आहेत. मुंबई, बडोदे, इंदूर, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नई अशा सहा ठिकाणी या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सामने जैव सुरक्षा वातावरणात खेळण्यात येणार आहेत.

साखळी फेरीनंतर 7 दिवसांच्या अंतराने 26 जानेवारीपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. या बाद फेरीतील सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. 26 आणि 27 जानेवारीला क्वार्टर फायनल सामने खेळण्यात येणार आहेत. तर 29 जानेवारीला सेमी फायनल आणि 31 जानेवारीला फायनल सामना खेळला जाणार आहे.

या स्पर्धेत एकूण 38 संघ आमनेसामने असणार आहेत. या 38 संघांना 6 ग्रृपमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 5 एलिट आणि 1 प्लेट ग्रृप आहे. प्रत्येक एलिट ग्रृपमध्ये 6 टीम आहेत. तर प्लेट ग्रृपमध्ये 8 संघांचा समावेश आहे.

हे मोठे खेळाडू खेळणार

या स्पर्धेनिमित्ताने अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये गब्बर शिखर धवन दिल्लीकडून खेळणार आहे. तर संजू सॅमसन केरळचे प्रतिनिधित्व करणार आहे. फिरकीपटून युजवेंद्र चहल हरयाणासाठी खेळणार आहे. दिनेश कार्तिक तामिळनाडूकडून खेळताना दिसणार आहे. सुरेश रैना उत्तर प्रदेश कडून खेळणार आहे. सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदार असणार आहे. तसेच विशेष म्हणजे एस श्रीसंत या स्पर्धेद्वारे क्रिकेटमध्ये अनेक वर्षांनी पुनरागमन करतोय.

संबंधित बातम्या :

Syed Mushtaq Ali Trophy | 3 संघांचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्ये कोरोनाचा फैलाव, 20 जण पॉझिटिव्ह

(Syed Mushtaq Ali t 20 Trophy start 10 january 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.